pm surya ghar yojana प्रत्येक कुटुंबाला 300 युनिट पर्यंत मोफत वीज ; केंद्र सरकारची नवीन योजना.

WhatsApp Group Join Now

pm surya ghar yojana देशात वाढता प्रदूषणाचा प्रश्न लक्षात घेता केंद्र सरकारने देशातील करोडो कुटुंबांना 300 युनिट पर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे आणि यासाठी एक योजना जाहीर करून या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबातील घरांवर सोलर बसवण्यात येणार आहेत तर मग काय आहे ही योजना आणि तयारीचा लाभ कसा घ्यायचा तसेच योजनेअंतर्गत अनुदान किती असेल याबद्दल सविस्तर माहिती या लेखात जाणून घेऊया.

केंद्र सरकारची नवीन योजनेची घोषणा.

भारत देशामध्ये मोदी सरकार सोलार एनर्जी मध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी हवे ते प्रयत्न करत आहे ज्यामध्ये आता देशातील प्रत्येक कुटुंबाला सौर ऊर्जेद्वारे वीज देण्यात येणार आहे. आणि यासाठी मंगळवारी पंतप्रधान मोदी यांनी पीएम सूर्य घर योजना जाहीर केली.pm surya ghar yojana.

हे पण वाचा :- अशोक चव्हाणांचा भाजपात प्रवेश ; चव्हाण यांच्यावर पक्षाची मोठी जिम्मेदारी..!

पीएम सूर्य घर योजनेचे वैशिष्ट्य.

pm surya ghar yojana पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत देशातील मध्यमवर्गीय १ कोटीहुन अधिक कुटुंबांना तीनशे युनिट पेक्षा जास्त वीज मोफत देण्यासाठी सोलर पॅनल व इतर गोष्टी देण्यात येणार आहेत.
योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला रुफटॉप सोलरला अतिरिक्त प्रोत्साहन देऊन सबसिडी देण्यात येणार आहे.
या योजनेमुळे विज बिलात कटोती, आणि अतिरिक्त रोजगार निर्मिती होणार आहे.

योजनेसाठी पात्रता व अटी.

पीएम सूर्य घर योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न दीड लाखांपेक्षा कमी असायला हवे, लाभार्थ्याकडे चालू हंगामातील लाईट बिल द्येय केलेले प्रत असायला हवी. व लाभार्थी कोणत्या शासकीय किंवा निम्न शासकीय सेवेत कार्यरत नसावा.pm surya ghar yojana

हे पण वाचा :- विमानतळाच्या सुविधा असलेले राज्यातील पहिले आधुनिक बस स्थानक..!

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे.

लाभार्थ्याचे आधार कार्ड, कोणतेही एक ओळखपत्र, चालू हंगामातील विज बिल प्रत, बँक पासबुक, चालू मोबाईल नंबर व एक ईमेल आयडी या सर्व कागदपत्रांसोबत तुम्ही या योजनेस अर्ज करू शकता.

योजनेसाठी अर्ज केल्यानंतर सर्व आवश्यक बाबींची पूर्तता करून घ्यावी लागेल व त्यानंतर तुम्हाला अधिकृतरित्या सोलार पॅनलचे विस्थापन करण्यात येईल व त्यानंतर तुमच्या बँक खात्यावर योजनेअंतर्गतच्या सबसिडीची रक्कम जमा करण्यात येईल.

 

Leave a Comment