Post Office Aadhar Yojana आधार कार्ड काढणे, अपडेट करणे सर्व सुविधा आता पोस्ट ऑफिस मध्ये मोफत मिळणार.

WhatsApp Group Join Now

Post Office Aadhar Yojana पोस्ट ऑफिस तर्फे खेडेगावातील अशिक्षित नागरिकांसाठी तसेच ज्या लोकांची सरकारी सुविधा अभावी पळापळ होत आहे त्यांच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरत आहे. आता पोस्ट ऑफिस तर्फे आधार कार्ड काढणे, अपडेट करणे, मोबाईल नंबर लिंक करणे तसेच इतर सर्व प्रकारची ऑनलाइन कामे अगदी मोफत स्वरूपात करून देण्यात येत आहेत.

पोस्ट ऑफिस करणार ही ऑनलाईन कामे मोफत.

Post Office Aadhar Yojana डाक विभागामार्फत नवीन व्यक्तीचे आधार कार्ड काढणे, दहा वर्षापूर्वीचे आधार कार्ड अपडेट करून देणे, आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करणे तसेच आधार कार्ड मध्ये बायोमेट्रिक फिंगर व फेस ऑथेंटिकेशन अपडेट करून देणे अशा प्रकारची कामे अगदी निशुल्क करून देण्यात येत आहेत.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर ; पी एम किसानचा हाप्ता 28 फेब्रुवारीला 4000 रुपयांचा जमा होणार..!

या तारखेपर्यंत मिळणार मोफत सुविधा.

पोस्ट ऑफिसच्या डाक विभागामार्फत 15 फेब्रुवारी ते 15 मार्च या एका महिन्याच्या कालावधीमध्ये सर्व आधार कार्ड धारक लाभार्थ्यांची आधार कार्डशी संबंधित असलेली कामे अगदी निशुल्क करून देण्यात येत आहेत. व नागरिकांना शासनाच्या व लोकहितांच्या योजनेचा फायदा मिळण्यास यामुळे मोठी मदत होत आहे.

आधार कार्ड व्यतिरिक्त या ऑनलाइन सुविधा देखील मिळणार.

Post Office Aadhar Yojana पोस्ट ऑफिस द्वारे केवळ आधार कार्डशी संबंधित सुविधाच नव्हे तर, महिला सन्मान बचत खाते उघडून देणे, महिला सुकन्या कर्ज योजना व पासपोर्ट काढणे यांसारख्या लोकहितांच्या योजनांची अंमलबजावणी देखील पोस्ट विभागामार्फत करण्यात येत आहे याचा देखील सुविधांचा देण्यात येत आहे.

हे पण वाचा :- महिलांवर पैशांचा पाऊस ; महिलांना मिळणार हवे तेवढे कर्ज..!

कोणत्या पोस्ट ऑफिस मध्ये या सुविधा मिळणार.

परभणी जिल्ह्यातील मुख्य पोस्ट ऑफिस, विद्यापीठ पोस्ट ऑफिस, पाथरी पोस्ट ऑफिस व सेलू, गंगाखेड, मानवत, जिंतूर या ठिकाणच्या सर्व शासकीय पोस्ट ऑफिस तर्फे आधार कार्ड व आधार कार्डशी संबंधित सर्व योजना निशुल्क दरामध्ये पूर्ण करून दिल्या जातील.

हिंगोली जिल्ह्यांच्या देखील या पोस्ट ऑफिस मध्ये सुविधा मिळणार.

हिंगोली जिल्ह्यातील मुख्य पोस्ट ऑफिस, औंढा नागनाथ, कळमनुरी, सेनगाव, वसमत नगर मधील सर्व शासकीय पोस्ट ऑफिस तर्फे देखील निशुल्क या सुविधांचा लाभ देण्यात येईल अशी माहिती डाक अध्यक्ष मोहम्मद कदीर यांनी दिली.Post Office Aadhar Yojana .

Leave a Comment