सर्वात मोठी खुशखबर..! पोस्ट ऑफिस कडुन कमी ठेवीवर मिळणार अधिक व्याज रक्कम, असा घ्या योजनेचा लाभ. Post Office Masik Bachat Yojana.

WhatsApp Group Join Now

Post Office Masik Bachat Yojana.सर्वसामान्य नागरिकांना ज्या प्रकारे भविष्याची चिंता असते त्याच प्रकारचे चिंता शासकीय कर्मचाऱ्यांना देखील आहे. कारण की नवनियुक्त शासकीय कर्मचाऱ्यांना सरकारने पेन्शन लागू केली नाही. असे असले तरी पोस्ट ऑफिस कडून शेतकऱ्यांसाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनच्या पटीमध्ये परतावा देणारी योजना सुरू केली आहे.

काय आहे पोस्ट ऑफिसची व्याज परतावा योजना.

पोस्ट ऑफिस मासिक बचत योजनेअंतर्गत राज्यातील सर्वसामान्य व कर्मचारी वर्गातील नागरिकांसाठी दरमहा गुंतवणूक करून त्या गुंतवणुकीवर पोस्ट ऑफिस कडून 7.4% व्याजदर दिले जाते. व या योजनेअंतर्गत गुंतवणूक केल्यास गुंतवणुकीवर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम बचत खात्यामध्ये जमा होते व या व्याजाच्या बचत रकमेवर देखील पुन्हा 4% व्याज देण्यात येते.Post Office Masik Bachat Yojana.

कोणाला आणि किती रुपयापर्यंत गुंतवणूक करता येते.

पोस्ट ऑफिस मासिक बचत योजनेअंतर्गत राज्यांमधील 18 वर्षांच्या पुढील महिला व पुरुष एक रकमी किंवा मासिक पद्धतीने गुंतवणूक करू शकतात. विशेष म्हणजे या योजनेअंतर्गत किमान 1000 रुपयांपर्यंतची रक्कम देखील गुंतवता येते. तसेच या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व स्तरातील नागरिकांना लाभ देण्यात येतो.

📢 हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! मागेल त्याला सोलार योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी ; आता लगेच अर्ज लगेच मंजुरी..!

योजनेअंतर्गत या बचत खात्यांचे प्रकार.

पोस्ट ऑफिस मासिक बचत योजनेअंतर्गत गुंतवणूक करण्यासाठी दोन प्रकारच्या बचत खात्यांचा समावेश आहे. यामध्ये वैयक्तिक बचत खात्यामध्ये जास्तीत जास्त नऊ लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते तर किमान 1000 रुपयांपासून या अंतर्गत गुंतवणूक करता येते.
तसेच संयुक्त बचत खात्यामध्ये दोघांना किंवा तिघांना एकत्र गुंतवणूक करता येते, तर या खात्यामध्ये जास्तीत जास्त 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्याची मर्यादा ठेवण्यात आली आहे.Post Office Masik Bachat Yojana.

किती गुंतवणुकीवर किती मिळणार रक्कम.

या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास वर्षाला 36 हजार 996 रुपये रक्कम मिळते. तर महिन्याला 3 हजार 83 रुपयांपर्यंत रक्कम मिळते.
जर योजनेमध्ये नऊ लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास वार्षिक 66 हजार 600 रुपये मिळतील. व महिन्याला 5 हजार 550 रुपये मिळतील.
तसेच या योजनेअंतर्गत 15 लाख रुपये गुंतवणूक केल्यास वार्षिक 1 लाख 11 हजार रुपये मिळतील. व महिन्याला 9 हजार 250 रुपये पेन्शन मिळेल.

📢 हे पण वाचा :- शेतकऱ्यांना मागेल त्याला व हवे तेवढे पीक कर्ज एका क्लिकवर मिळणार, किसान क्रेडिट कार्ड योजनेला सुरुवात..!

योजनेअंतर्गत चे काही नियम आणि अटी.

पोस्ट ऑफिस भाषिक बचत योजनेअंतर्गत किमान पाच वर्षे गुंतवणूक करणे बंधनकारक आहे. तसेच एका वर्षामध्ये गुंतवणूक करून या योजनेअंतर्गत माघार घेता येणार नाही. व मुदतपूर्व गुंतवणुकीची रक्कम परत मिळवायचे असल्यास ठेवीच्या रकमेमधील किमान 2% रक्कम कपात करण्यात येईल.

Leave a Comment