खुशखबर..! पिक विमा योजनेवर केंद्र सरकारचे नियंत्रण ; नुकसानीसाठी आता जादा मिळणार पिक विमा. Pradhan Mantri Fasal Vima Yojana.

WhatsApp Group Join Now

Pradhan Mantri Fasal Vima Yojana. प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या निकषांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना ज्यादा पिक विमा नुकसान भरपाई मिळण्यासाठी योजनेच्या निकषांमध्ये केंद्र सरकारने काही महत्त्वपूर्ण असे मोठे बदल केले आहेत. या नवीन बदलानुसार खरीप हंगाम 2023 मधील पावणे दोन कोटी विमा प्रस्तावांची नवीन निकषानुसार छाननी करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य मध्ये नऊ पीक विमा कंपन्यांना देण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांना घरबसल्या समजणार नुकसान भरपाईचा तपशील.

केंद्र सरकारने प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत लागू केलेल्या नवीन निकषानसार आता विमा कंपन्यांकडे प्राप्त झालेल्या प्रत्येक शेतकऱ्यांच्या दाव्यांवर घेतलेला निर्णय केंद्र शासनाकडे सादर करावा लागणार आहे.
 व या निर्णयाबद्दल च सविस्तर माहिती केंद्र शासनाला द्यावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या https://pmfby.gov.in/  या केंद्र शासनाच्या अधिकृत अशा संकेतस्थळावर शेतकऱ्यांनी सादर केलेला नुकसान भरपाईचा तपशील व शेतकऱ्यांच्या विमा प्रस्तावाची माहिती मिळणार आहे.

विमा कंपन्यांना केंद्र सरकारची वेसन.

विमा कंपनीकडे प्राप्त झालेले नुकसान भरपाई च दावे आणि इतर विम्याचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करावे लागणार असल्यामुळे, नुकसान ग्रस्त शेतकऱ्याचे मागील थकीत प्रस्ताव देखील शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहेत. विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना खोटी माहिती देत विम्याची रक्कम दुसऱ्या बँक खात्यामध्ये वळती केल्यास शेतकऱ्याला तात्काळ याची माहिती मिळेल. Pradhan Mantri Fasal Vima Yojana.
व सर्वात महत्त्वाचे म्हणजे विमा कंपन्याकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी विम्याची रक्कम मंजूर झाल्यास ती रक्कम केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली नुकसान भरपाईसाठी पात्र असणाऱ्या लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

लवकरच 2023 ची नुकसान भरपाई मिळणार.

महाराष्ट्र राज्यामध्ये खरीप 2023 मध्ये नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप केले नुकसान भरपाईचे मदत मिळाली नाही. व आता प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत केंद्र सरकारने नियम व निकष बदलल्यामुळे पिक विमा कंपन्या सक्रिय झाल्या आहेत.
 केंद्र सरकारने जाहीर केलेले नवीन निकष किचकट असले तरीदेखील, याच निकषानुसार राज्यातील थकीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई चे वितरण करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. त्यामुळे लवकरच उर्वरित विमा दावे अंतिम होतील व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाची रक्कम जमा होईल.Pradhan Mantri Fasal Vima Yojana.

Leave a Comment