Punjab dakh hawaman andaz :- राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज ; या जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता.

WhatsApp Group Join Now

Punjab dakh hawaman andaz :-राज्यात मागील काही दिवसात थंडीचे प्रमाण कमी होऊन ढगाळ वातावरण तयार होत आहे तसेच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये दमट वातावरण तयार होऊन त्या जिल्ह्यांत अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान तज्ञ पंजाब डक यांनी वर्तवली आहे तसेच त्यांनी मागील काही दिवसांमध्ये वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे सध्या थंडीचे प्रमाण कमी होऊन ढगाळ वातावरण तयार होण्यास सुरुवात झाली आहे आणि पुढील अवकाळी पाऊस होण्याची शक्यता देखील पंजाब डक सर यांनी वर्तवली आहे. तर मग कोणत्या जिल्ह्यात अवकाळी पाऊस होणार आहे आणि किती तारखेपासून अवकाळी पाऊस होणार असल्याचे पंजाब डक सर यांनी सांगितले आहे चला तर मग सविस्तरपणे जाणून घेऊया.

या जिल्ह्यांत पावसाचे वातावरण तयार :-

राज्यात गारवा कमी होऊन उन्हाचा चटका चांगलाच वाढला आहे आणि उकाड्याचे प्रमाण हे वाढत आहे. अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा ३२° सेल्सियस च्या वर सरकला आहे तसेच काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणाची निर्मिती होऊन अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.

हे पण वाचा :- PM KISAN योजनेच्या 11कोटी लाभार्थ्यांसाठी खुशखबर ; संसदेच्या चर्चासत्रात 16 व्या हप्त्याची तारीख जाहीर.

या जिल्ह्यांना अवकाळीचा सर्वात मोठा फटका :-

राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाला पोषक वातावरण तयार होत असून कमाल आणि किमान तापमानामध्ये वाढ देखील झाली आहे. त्यामुळे सोलापूर कोल्हापूर पुणे वाशिम अकोला यवतमाळ या जिल्ह्यांसह मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील देखील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस होण्याचे संकेत आहेत.

यामुळे राज्यात अवकाळी पावसाची शक्यता :-

देशातील उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचे प्रमाण कमी जास्त होत आहे. ७ तारखेला हरियाणामध्ये नीचांकी ४.२ अंश सेल्सिअस तापमानाचे नोंद केली गेली. तसेच राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड व उत्तराखंड या राज्यामध्ये किमान तापमान ४ ते ८ अंशाच्या खाली होते. व त्यामुळे पूर्व विदर्भापासून तेलंगणा कर्नाटकापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा कायम आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामधील मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी मोफत परदेश दौरा ; जाण्यासाठी लगेच अर्ज करा..!
पुढील आठवड्याचा पंजाब डकयांचा हवामान अंदाज :-

राज्यात पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये 11 फेब्रुवारीपासून 15 फेब्रुवारी पर्यंत जोरदार वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता पंजाब यांनी वर्तवली आहे. तसेच पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, परभणी व नांदेड या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

Leave a Comment