punjab dakh wheather forcast पुढील दोन दिवस या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा, पंजाब डक यांचा हवामान अंदाज.

WhatsApp Group Join Now

punjab dakh wheather forcast खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाचा दीर्घकाळ खंड पडल्यामुळे शेतकऱ्याला पेरणी करण्यास विलंब झाला व खरीप हंगामातील पिकांच्या उत्पन्नात घट झाली. तर आता कुठेतरी रब्बी हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या पदरात पडणार तोच राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. रब्बी हंगामातील ज्वारी, बाजरी व गहू या पिकांची काढणी व मळणी चालू असताना राज्यात अवकाळी पाऊस, नुकसान वादळी वारे व गारपीट यामुळे या पिकांचे अतोनात नुकसान होत आहे.

राज्यात अवकाळी पावसाचे थैमान.

punjab dakh wheather forcast  खानदेशामध्ये शुक्रवारी व शनिवारी संध्याकाळी अवकाळी पाऊस व जोराचा वादळी वारा वाहत होता. तर त्याच वेळेस गारपीट व अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला, व नुकसानग्रस्त क्षेत्र यामुळे आणखीनच वाढले.

📢 हे पण वाचा :- कापूस दरातील तेजी कायम ; या बाजार समितीमध्ये कापसाला 9000 रुपयांपर्यंत ‌भाव, पहा आजचे बाजारभाव..!

खानदेशामध्ये जोरदार अवकाळी पाऊस.

खानदेशामध्ये 26 ते 29 फेब्रुवारी दरम्यान जोरदार अवकाळी पाऊस व गारपीट झाली. यामुळे लोणी, बीडगाव, वर्धमान, माचले व मंगरूळ या तालुक्यांना याचा सर्वाधिक फटका बसला. काही गावात जोरदार पावसामुळे शेतांचे बांध तुटले तर काही गावात शेतकऱ्याच्या ज्वारी व बाजरी ही पिके शेतात झोपली‌.

राज्यात उन्हाचा चटका वाढला.

मागील आठवड्यात राज्यातील विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व खानदेशात अवकाळी पावसाच्या तडाख्यानंतर या राज्यात सर्वत्र उन्हाचा चटका वाढला आहे. तापमानाचा पारा 39 अंशापार गेल्याने राज्यात उन्हाळ्याची चाहूल लागत आहे. तर तुरळक जिल्ह्यांमध्ये संध्याकाळी गारवा पडत असून दिवसभर ढगाळ वातावरण कायम आहे.punjab dakh wheather forcast .

📢 हे पण वाचा :- वयोवृद्धांसाठी 4 मोठ्या योजना ; ज्येष्ठ नागरिकांना मिळणार दरमहा 20 हजार रुपये पगार..!

या जिल्ह्यांत पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज.

देशात राजस्थान व महाराष्ट्राच्या पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा सक्रीय असल्यामुळे राज्यात काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार होत आहे. त्यामुळेच पुढील दोन दिवसात राज्यातील गोंदिया व भंडारा या दोन जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कसा राहील यावर्षी पर्जन्यमान.

गेल्या वर्षी देशात पावसाने शेतकऱ्यांची नाराजी केल्यानंतर यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला लवकरच व चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभाग वर्तवत आहे. यावर्षी 6 जून ते 9 जून दरम्यान राज्यात मोसमी मान्सून दाखल होऊन 15 जून पर्यंत राज्यभर मान्सूनचा पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.punjab dakh wheather forcast.

Leave a Comment