राशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी ; हे काम पूर्ण केले तरच मिळणार आता राशन, पहा नवीन नियम. Ration Card New Update.

WhatsApp Group Join Now

Ration Card New Update. राज्यातील शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना म्हणजेच राशन कार्डधारक लाभार्थ्यांना दर महिन्याला वितरित करण्यात येणाऱ्या राशनसाठी दुकानाबाहेर रांगा लावाव्या लागतात. तसेच राशन कार्डधारक लाभार्थ्यांच्या अंगठ्याचा ठसा स्कॅन करूनच राशींचे वितरण करण्यात येत असते परंतु बहुतेक वृद्ध व्यक्तींचे व तरुण व्यक्तींचे हाताचे ठसे स्कॅन होत नसल्यामुळे अशा लाभार्थ्यांना राशन पासून वंचित राहावे लागते आणि आता यासाठीच राज्य शासनाने राशन ग्राहकांसाठी नवीन नियम लागू केले आहेत.

राज्यातील राशन वितरणाची पद्धती.

राज्यातील राशन दुकानांमध्ये ई पास मशीन वर हाताच्या अंगठ्याचा स्कॅन होत नसल्यामुळे हजारो राशन कार्डधारक लाभार्थी राशन पासून वंचित राहत आहेत व याच कारणामुळे राशन दुकानदार व ग्राहक यांच्यामध्ये वाद निर्माण होतात. यावर तोडगा म्हणून महाराष्ट्र शासनाने राज्यांमधील 52 हजार 500 राशन दुकानांवरील राशन वितरणाची पद्धती बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राशन ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.

📢 हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! मागेल त्याला सोलार योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी ; आता लगेच अर्ज लगेच मंजुरी..!

राशन ग्राहकांचे होत होती फसवणूक.

Ration Card New Update. राज्यात 2016 मध्ये राशन दुकानांमध्ये 2G ई पास मशीन बसवण्यात आली होती या मशीन अंतर्गत राशन ग्राहकांचे ठसे स्कॅन करून व आधार नंबर टाकून ग्राहकांची ओळख पटवून राशन चे वाटप केले जात होते. परंतु नेटवर्कच्या प्रॉब्लेम मुळे किंवा हाताचे ठसे उमटत नसल्यामुळे राशन दुकानदार ग्राहकांना राशन चे वाटप करत नव्हते व हा शिल्लक राशनचा माल काळ्या बाजारात विक्री केला जात होता.

नवीन मशीनद्वारे होणार राशनचे वाटप.

राशन ग्राहकांचे ओळख पटवण्यासाठी 2016 मध्ये अन्न व पुरवठा विभागाने राज्यातील राशन दुकानांमध्ये 2G इ पास मशीन बसवले होते जे आता कालबाह्य ठरत असून त्यांच्या जागेवर 4G ई पास मशीन बसवण्यात येणार असून त्यांच्याद्वारे आता ग्राहकांच्या डोळ्यांचे बुबुळे स्कॅन करून राशन ग्राहकांची ओळख पटवली जाणार आहे.

📢 हे पण वाचा :- निवडणुकीच्या मुहूर्तावर राज्यात सरसकट कर्जमाफीची घोषणा ; अखेर आज शासन निर्णय आला..!

अशी असेल नवीन नियमावली.

नेटवर्क नसणे, आधार जोडणी न होणे यामुळे ज्येष्ठ नागरिकांचा ठसा उमटत नसल्यामुळे याचा ग्राहकांना त्रास होत होता. त्यामुळे नवीन योजना लागू करण्याकरिता तीन संस्थांमध्ये करार करण्यात आला आहे. यामध्ये पण नागरी व पुरवठा विभाग व ग्राहक सुरक्षा विभागाचे सचिव सुमंत भांगे यांनी माहिती दिली.

ही नवीन प्रक्रिया लागू झाल्यामुळे आधार पडताळणीचा प्रश्न संपणार आहे.Ration Card New Update.
या मशीनच्या वापरामुळे राशन वितरणाच्या प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता व सुलभता येणार आहे‌.
तसेच राशन दुकानदारांकडुन राशन मालात होत असलेला घोळ थांबणार आहे.

Leave a Comment