Ration card news  :- राज्यातील या महिलांना होणार मोफत नऊवारी साडीचे वाटप.

WhatsApp Group Join Now

Ration card news :- राज्यातील महिला लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे राज्यातील महिलांना सणासुदीच्या काळामध्ये प्रति महिला प्रति लाभार्थी एका साडीचे वाटप करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे आणि या महिला लाभार्थ्यांना या साडीचे वितरण त्यांच्या गावातील रेशन दुकानामार्फत करण्यात येणार आहे तर मग या अंतर्गत कोणत्या महिला पात्र असतील आणि त्यांना कधी पर्यंत या साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे चला तर मग सविस्तररित्या जाणून घेऊया.

राज्यातील महिला लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी.

महाराष्ट्र राज्य सरकारने कॅपिटिव्ह योजनेअंतर्गत राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिला लाभार्थ्यांना सणासुदीच्या मुहूर्तांवर अत्यंत चांगल्या दर्जाच्या साड्यांचे वितरण करण्यात येणार आहे आणि जिल्हा पुरवठा विभागा कडून जिल्ह्यानुसार ही योजना सध्या राबवली जात आहे. Ration card news 

राज्य सरकारकडून 25 जानेवारीला राज्यात सर्व जिल्ह्यात या साडीचे वितरण करण्यात यावे यासाठी जिल्हा पुरवठा विभागाला निर्देश देण्यात आले होते व यापुढे 24 मार्च म्हणजे होळी या सणाचे औचित्य साधून देखील राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिला लाभार्थ्यांना साडीचे वाटप करण्यात येणार आहे.

हे ही वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2109 कोटी निधी वितरणास मंजुरी.

महिलांना मोफत नऊवारी साडीचे वाटप.

राज्य सरकारच्या राज्य यंत्रमाग मंडळाकडून शिधापत्रिका धारक महिला लाभार्थ्यांच्या यादीनुसार लाभार्थी महिलांच्या संख्येनुसार साड्यांचे गट्टे हे त्या तालुक्यातील प्रत्येक रेशन दुकानांमध्ये पोहोचविण्यात येणार आहेत आणि प्रत्येक मोठ्या सणाचे औचित्य साधून याचे वितरण देखील महिला लाभार्थ्यांना करण्यात येणार आहे. Ration card news 

राज्य सरकारने केलेल्या घोषणेनुसार ही योजना राज्यामध्ये पाच वर्षाकरिता राहून यामध्ये येणार आहे म्हणजे 2023 ते 2018 या वर्षामध्ये एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरणाला चालना देण्यासाठी राज्य सरकारने या योजनेस मान्यता दिली आहे.

हे ही वाचा :- शेतकरी मालामाल..! बाजारात तूर व घेवडा/पावटा 12,000 रुपयांच्या पार.

फ़क्त याच कुटुंबातील महिलांना मिळणार लाभ.

महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 24.58 लाख कुटुंबाकडे अंत्योदय शिधापत्रिका असल्यामुळे या लाभार्थ्यांना योजनेचा मोठा फायदा होणार आहे. तसेच लाभार्थ्यांना 355 रुपयांची साडी ही अगदी मोफत देण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे.Ration card news 

राशन दुकानावर मागील काही दिवसांपासून अवघ्या शंभर रुपये मध्ये आनंदाचा शिधा राशन कार्डधारक लाभार्थ्यांना देण्यात येत आहे आणि आता या आनंदाच्या शेतासोबतच राज्यातील गोरगरीब कुटुंबातील महिला लाभार्थ्यांना साडींचे वाटप देखील करण्यात येणार आहे

तर मग तुम्ही देखील अंत्योदय शिधापत्रिकाधारक लाभार्थी असाल तर तुमच्या घरातील महिला लाभार्थ्यांसाठी तुम्ही तुमच्या नजीकच्या रेशन दुकानामधून या योजनेअंतर्गत च्या मोफत साडीचा लाभ घेऊ शकता धन्यवाद…!

Leave a Comment