नवीन नियमांनुसार या वाहनांना आता BH सिरीज पासिंग नंबर, पहा कोणाला मिळू शकतो हा नंबर. RTO New Number Series.

WhatsApp Group Join Now

RTO New Number Series देशात प्रत्येक राज्यानुसार वाहनांच्या पासिंगसाठी सिरीयल नंबर ठरवले जातात. जसे की महाराष्ट्र राज्यातील आरटीओ नोंदणीकृत वाहनांसाठी MH तर गुजरात राज्यातील नोंदणीकृत वाहनांना GJ या सिरीयलची पासिंग मिळते परंतु रस्ते वाहतूक आणि परिवहन मंडळाने आता देशातील या नवीन कारला BH सिरीयल असणारे नंबर देण्यास सुरुवात केली आहे.

काय आहे ही नवीन BH नंबर सिरीज.

RTO New Number Series. भारत देशातील रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाने BH ही वाहनांसाठी नवीन पासिंग नंबरची सिरीज सुरू केली आहे. ज्या अंतर्गत नोकरी करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची देशातील इतर कोणत्याही राज्यात बदली झाल्यास त्यांना दरवेळेस आपला नंबर बदलण्याची गरज पडणार नाही. अशा लाभार्थ्यांची दुचाकी किंवा चार चाकी वाहने BH या सिरीजच्या नंबरने पासिंग करून दिली जातात.

📢 हे पण वाचा :- मोदी सरकारची मोठी घोषणा ; निवडणुकीच्या मुहूर्तावर गॅस झाले स्वस्त, पहा नवीन गॅसचे भाव..!

BH या नंबर सिरीजची पासिंग कोणाला घेता येते.

केंद्र सरकारची व राज्य सरकारची कर्मचारी, संरक्षण क्षेत्रातील कर्मचारी, बँक कर्मचारी, चार पेक्षा जास्त राज्य व केंद्रशासित प्रदेशामध्ये कार्यालय असणारे खाजगी कंपनीचे कर्मचारी व प्रशासकीय सेवा कर्मचारी या नंबरची पासिंग आपल्या दुचाकी व चारचाकी वाहनांना घेऊ शकतात.RTO New Number Series.

BH सिरीजचे पासिंग घेण्याचे फायदे.

तुम्ही तर शासकीय किंवा निम्न शासकीय सेवेत असाल आणि तुम्हाला सतत इतरांच्या मध्ये कामासाठी जावे लागत असेल तर तुम्हाला याचा फायदा होईल. या BH सिरीजची पासिंग संपूर्ण देशात वैद्य असल्यामुळे तुम्हाला कोठेच अडचण येणार नाही.

📢 हे पण वाचा :- खुशखबर..! आता घरेलु कामगारांना सुद्धा मिळणार भांडी संच व 5000 रुपये अनुदान..!

अशी आहे आरटीओ ऑफिसची पासिंगची नियमावली.

तुम्ही जर इतर राज्यामध्ये जाऊन काम करत असाल तर त्या ठिकाणी तुमच्या गाडीचा नंबर हा विना नोंदणी शिवाय 12 महिने चालतो. परंतु त्यानंतर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू नका तुम्हाला दंड आकारला जाऊ शकतो, त्यामुळेच तुम्ही या सिरीची पासिंग करून दुसऱ्या राज्यांमध्ये देखील अगदी सुरळीतपणे प्रवास किंवा काम करू शकता.

या पासिंग साठी अर्ज कसा करायचा.

BH या सिरीजची पासिंग घेण्यासाठी तुम्हाला एमओआरटीएच या अधिकृत वेबसाईटवर जाऊन फॉर्म 20 भरावा लागेल. तसेच जर तुम्ही चार पेक्षा जास्त राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये राहणार असाल तर फॉर्म 60 भरावा लागेल. अर्ज करते वेळेस सिरीजच्या प्रकारात BH निवडुंग अर्ज दाखल करावा.RTO New Number Series.

Leave a Comment