SAND BOOKING ONLINE वाळुसाठी ऑनलाइन अर्ज चालु ; या लोकांना मिळणार मोफत वाळू.

WhatsApp Group Join Now

SAND BOOKING ONLINE राज्यातील नागरिकांना बांधकाम करण्यासाठी वाळू पुरवण्याकरता राज्य शासनाने रेती धोरण लागू केले होते. प्रत्येक कुटुंबाला सहाशे रुपये ब्रास प्रमाणे बारा ब्रास पर्यंत वाळू या धोरण अंतर्गत देण्यात येणार होती आणि यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज देखील मागवले होते. परंतु आता राज्य शासनाने हे धोरण रद्द करून “ना नफा ना तोटा”या पद्धतीने लोकांना वाळू पुरवण्याचे नियोजन केले आहे.

काय आहे नवीन वाळु धोरण ?

बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनुसार आता राज्यातील बांधकाम करणाऱ्या नागरिकांना सहाशे रुपये ब्रास प्रमाणे वाळूचे वितरण करण्याचे धोरण बदलण्यात आले आहे. आता यापुढे ऑनलाईन पद्धतीने नागरिकांना वाळू पुरवण्यात येणार आहे. ही वाळू इच्छुक व्यक्तींना “ना नफा ना तोटा” या पद्धतीने दिली जाणार आहे.SAND BOOKING ONLINE.

नव्या धोरणानुसार वाळूचे वाटप.

SAND BOOKING ONLINE संबंधित नदी व खाडीपात्रातून वाळू चा उपसा, डेपोपर्यंत वाळूची वाहतूक व डेपो निर्मिती व व्यवस्थापनासाठी संबंधित जिल्ह्यातील डेपोनिहाय प्रसिद्ध करण्यात येणारा दर अंतिम राहील. या वाळूच्या जिल्ह्याअंतर्गत वितरणासाठी व जिल्ह्याबाहेर वितरणासाठी वेगवेगळे दर असतील.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी व प्लास्टिक अस्तीकरण्यासाठी 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर..!

जुन्या वाळू धोरणात सुधारणा.

राज्य सरकारने राज्यातील काम करणाऱ्या नागरिकांना वाळू मिळण्यासाठी सहाशे रुपये प्रति ब्रास याप्रमाणे प्रति कुटुंब बारापर्यंत वाळू वितरण करण्यासाठी रेती धोरण जाहीर केले. आता या वाळू धोरणात सुधारणा करून बांधकाम करणाऱ्या नागरिकांना नव्या धोरणांतर्गत वाळूचे वाटप करण्यात येत आहे व यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज देखील मागवले जात आहेत.

घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू.

राज्य सरकारच्या रमाई आवास योजनेअंतर्गत तसेच मोदी आवास योजनेअंतर्गत किंवा इतर कोणत्याही योजनेअंतर्गत घरकुल मिळालेल्या लाभार्थ्यांसाठी या नवीन वाळू धोरणाअंतर्गत प्रति लाभार्थी पाच ब्रास पर्यंत वाळू मोफत जाईल. वाळू डेपो पासून घरकुल लाभार्थ्याला वाळू वाहतूक करण्यास येणारा खर्च संबंधित लाभार्थ्याला भरावा लागणार आहे.SAND BOOKING ONLINE.

हे पण वाचा :- याच महिन्यात जमा होणार PM KISAN व NAMO SHETKARI योजनांच्या हफ्त्यांचे पैसे..!

ऑनलाइन वाळुसाठी अर्ज कसा करावा.

SAND BOOKING ONLINE नवीन वाळूच्या धोरणानुसार प्रत्येक तालुक्यातील उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली वाळू संनियंत्रण समिती स्थापन करण्यात येणार आहे. व समितीच्या अध्यक्षस्थानी संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील. व ही समिती संबंधित वाळू डेपोची निर्मिती करून या वाळूच्या वितरणासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवणार आहे. इच्छुक व्यक्तीने आपल्या तालुक्यातील संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून यासाठी अर्ज सादर करायचा आहे.

Leave a Comment