Saur Fencing Subsidy Maharashtra लगेच अर्ज लगेच सौर कुंपन ; अनुदानात वाढ अजित पवार यांची मोठी घोषणा.

Saur Fencing Subsidy Maharashtra राज्यातील शेतकऱ्यांना वन्य प्राण्यापासून शेती पिकांचे व शेती उपयोगी वस्तूंचे संरक्षण करण्याकरिता डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजनेअंतर्गत सोलार कृषी पंप याला कुंपण करण्यासाठी 75 टक्के पेक्षा जास्त अनुदान देण्यात येत आहे. व काल झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये यासाठी भरीव तरतूद करण्यात आली असून आता मागील त्याला सौर कुंपण या पद्धतीने यापुढे या योजनेची अंमलबजावणी केली जाईल व मागेल त्याला सौर कुंपण देण्यात येईल. तर मग योजनेसाठी अर्ज कसा करायचा, पात्रता काय आहे, अनुदान वितरणाची पद्धत काय असेल याबद्दल सविस्तर माहिती आजच्या लेखात जाणून घेऊया.

काय आहे सौर कुंपण योजना.

WhatsApp Group Join Now

शेतकऱ्यांना शेती पिकांचे नुकसान रोखण्याकरता व वन्य प्राण्यांपासून शेती पिकांचे व शेती उपयोगी वस्तूंचे संरक्षण करण्याकरिता डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजना अंतर्गत 75 टक्के अनुदानावर किंवा जास्तीत जास्त 15 हजार रुपये अनुदान देऊन शेतकऱ्याच्या सोलार कृषी पंपांना तारेचे कुंपण करण्यासाठी मदत केली जाते.Saur Fencing Subsidy Maharashtra.

हे पण वाचा :- वाळु धोरणात बदल ; आता 600 रुपये ब्रास नाही तर 2000 रुपये ब्रासने मिळणार वाळु..!

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजनेची कार्यपद्धती.

Saur Fencing Subsidy Maharashtra डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजनेअंतर्गत वन्य भागांलगतची जी गावे आहेत अशा गावातील शेतकऱ्यांना व नागरिकांना त्यांची उत्पादकता वाढवी व वन्य प्राण्यापासून या नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी उच्च स्तरावर ही योजना राबविण्यात येत असते. या योजनेअंतर्गत अशा गावातील शेतकऱ्यांची जंगलांवरील निर्भरता कमी करून त्यांना रोजगार निर्माण करून देणे, शेतीला विविध प्रकारचे जोडधंदे निर्माण करून देणे यासाठी या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर अनुदान देण्यात येते.

सौर कुंपण योजनेची रूपरेखा.

केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या सोलार कृषी पंप योजनेचा फायदा घेतलेल्या शेतकऱ्यांना या कृषी पंपाचे संरक्षण करण्यासाठी व वन्य प्राण्यांच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी या योजनेअंतर्गत सौर ऊर्जा कुंपणाच्या 75 टक्के रक्कम किंवा 15 हजार रुपये रोख यापैकी जी रक्कम कमी असेल ती रक्कम लाभार्थ्याला देण्यात येईल. व कुंपणासाठी लागणाऱ्या एकूण खर्चाच्या 25 टक्के रक्कम स्वतः लाभार्थ्याला भरावी लागणार आहे.Saur Fencing Subsidy Maharashtra.

हे पण वाचा :- अर्थसंकल्पीय अधिवेशन घोषणा ; ८ लाख 55 हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना कृषी पंप..!

योजनेसाठी अर्ज व अर्जाची पद्धत.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजना राबविण्यात येणाऱ्या गावांची निवड करण्यात येणार आहे. व या गावांमध्ये संबंधित ग्रामपंचायतच्या माध्यमातून हे अर्ज भरून घेतले जातील व त्यानंतर वनपरिक्षेत अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करून पात्र अपात्र लाभार्थी निवडून त्यांना अनुदानाचा लाभ देण्यात येईल.

 

 

 

Leave a Comment