Saur Krishi Vahini Yojana शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! राज्य सरकारची आणखिन २ लाख सौर कृषि पंपाची घोषणा.पहा संपूर्ण बातमी.

WhatsApp Group Join Now

Saur Krishi Vahini Yojana शेतकऱ्यांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार कार्यरत आहे. व शेतकऱ्यांसाठी शेततळे, विहिरी, बोरवेल, विद्युत मोटार आणि सोलार पंप अशा अनेक सिंचनाच्या योजना राज्य सरकार द्वारे राबवल्या जात आहेत. व आता याच अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख सोलर पंप वितरित करण्याचे राज्य शासनाने नियोजन केले आहे. तर मग यासाठी कोणते शेतकरी पात्र असतील व आजच्या शासन निर्णयानुसार योजनेची अंमलबजावणी कधी सुरू होईल याबद्दल सविस्तर माहिती आजच्या लेखात जाणून घेऊया.

महावितरण करणार दोन लाख सोलरचे वाटप.

केंद्र शासना अंतर्गत यापूर्वीच महावितरणला नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. व केंद्र शासनाच्या पीएम कुसुम सोलर योजनेअंतर्गत देण्यात येणारे सोलर वितरित करण्यासाठी 9 जानेवारी 2024 रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार महावितरणची सोलर वितरण एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.Saur Krishi Vahini Yojana.

📢 हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! अवकाळी पाऊस नुकसान भरपाई चे पुन्हा एकदा पैसे आले, पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची घोषणा..!

सोलर कृषी पंप वितरणाचा शासन निर्णय.

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खणीकर्म विभागाने दिनांक 5 मार्च 2024 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यातील कृषी पंप विज जोडणीचे व सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान यापुढे महावितरण कंपनी मार्फत अस्थापित करण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे

राज्यात महावितरण करणार सोलरचे वाटप.

Saur Krishi Vahini Yojana 9 मार्च 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार केंद्र शासनाने मंजूर केलेले एक लाख सोलार पंप हे महावितरणच्या मार्फत लावण्यासाठी परवानगी दिली.व ज्या शेतकऱ्यांनी विजेच्या जोडणीसाठी कोटेशन भरून अर्ज केले होते त्यांना या सोलर पंपाचे वाटप करण्यात येणार आहे.

📢 हे पण वाचा :- खुशखबर..! आजच्या शासन निर्णयानुसार आता घरेलू कामगारांना 10000 रुपये अनुदान, लगेचच अर्ज करा..!

राज्यातील या शेतकऱ्यांसाठी आहेत हे दोन लाख कृषी पंप.

राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी कुसुम सोलर योजना घटक ब अंतर्गत कोटेशन भरून विजेच्या जोडणीसाठी अर्ज केले होते, अशा शेतकऱ्यांसाठी व त्यांच्या बेड पेंडिंग साठी 19 जानेवारी 2023 रोजी यांनी पर्यंत आलेल्या शासन निर्णयानुसार महावितरण ला नोडल एजन्सी म्हणून नियुक्त केले व याच लाभार्थ्यांना दोन लाख सोलर कृषी पंपाचे आता वाटप करण्यात येणार आहे.

आता राज्यातील प्रत्येकाला मिळणार सोलार कृषी पंप.

9 मार्च रोजी च्या शासन निर्णयानुसार पेड पेंडिंगच्या शेतकऱ्यांसाठी सोलर कृषी पंप दिले जाणार होते परंतु आता ज्या शेतकऱ्यांनी महाऊर्जा कडे अर्ज दाखल केले आहेत अशा शेतकऱ्यांना देखील महावितरणच्या अंतर्गत सोलर कृषी पंपचे वाटप करण्यात येणारे. म्हणजे राज्यातील पेड पेंडिंग लाभार्थ्यांची 1 लाख सोलार कृषी पंप व महाऊर्जाकडे अर्ज केलेल्या लाभार्थ्यांसाठी 1 लाख असे एकत्र 2 लाख सौर कृषी पंप महावितरण वाटप करणार आहे.Saur Krishi Vahini Yojana.

 

Leave a Comment