खुशखबर..! किराणा दुकान, रिक्षा व्यवसाय व इतर व्यवसायासाठी राज्य शासनाकडून आर्थिक मदत. Shabari Adivasi Vikas Mahamandal.

WhatsApp Group Join Now

Shabari Adivasi Vikas Mahamandal. महाराष्ट्र राज्य मध्ये अण्णासाहेब पाटील विकास आर्थिक महामंडळ अंतर्गत राज्याचे मराठा बांधवांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जातात आणि याच योजनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मध्ये शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना रिक्षा व्यवसायासाठी, किराणा दुकानासाठी वडापाव किंवा चहाच्या हॉटेल व टपरीसाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे.

कोणत्या व्यवसायासाठी मिळणार.

राज्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ अंतर्गत रिक्षा व्यवसायासाठी, किराणा दुकानासाठी, रसवंती ग्रहासाठी, वडापाव व चहा दुकान किंवा टपरीसाठी तसेच इतर कोणत्याही स्थानिक व्यवसायासाठी या महामंडळ अंतर्गत अनुदानाचे वितरण करण्यासाठी 14 मार्च 2024 रोजी मान्यता देण्यात आली आहे.

काय आहे या योजनेचे उद्दिष्ट.

Shabari Adivasi Vikas Mahamandal. राज्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील व्यक्तींची आर्थिक उन्नती करणे, त्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून या प्रवर्गातील व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी प्रवर्त करणे, त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे व त्यांना व्यवसाय निर्मितीसाठी तात्काळ वित्त पुरवठा करणे अशा प्रकारची काही योजनेची उद्दिष्टे आहेत.

📢 हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! आचारसंहितेच्या अगोदर शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण शासनाचे निर्णय, पहा आजचे मंत्रिमंडळ निर्णय..!

काय आहे या योजनेचे स्वरूप.

राज्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील व्यक्तींना व्यवसायासाठी स्वयं रोजगारासाठी कर्जपुरवठा करण्यात येणार आहे.
तसेच स्थानिक पातळीवर वाव असणारा कोणताही व्यवसाय करण्यासाठी दोन लाख रुपयांपर्यंतच्या व्यवसायासाठी आर्थिक मदत करण्यात येणार आहे.
सदर योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीमध्ये राज्य शासनाचा वाटा 90% असून लाभार्थ्याचा वाटा 10% असणार आहे.
लाभार्थ्याला व्यवसायासाठी देण्यात येणाऱ्या कर्जाची परतफेड करण्यासाठी पाच वर्षाची मुदत असणार आहे.
योजनेअंतर्गत च्या लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जावर 4% व्याजदर असणार आहे.

व्यवसायासाठी लाभार्थ्याची निवड प्रक्रिया.

योजनेचा लाभ घेऊ इच्छित असणारे लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा स्थायिक असायला हवा.
तो अनुसूचित जमाती प्रवर्गातील असायला हवा.
लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण व शहरी भागासाठी तीन लाख रुपये एवढे असायला हवे.
लाभार्थी हा 18 ते 45 या वयोगटातील असायला हवा.
एका कुटुंबातील केवळ एकाच पात्र व्यक्तीस योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे.
अर्जदार व्यक्ती महामंडळाच्या कोणत्याही योजनेअंतर्गत थकबाकीदार नसावा.
योजनेअंतर्गत देण्यात येणारी कर्जाची जर लाभार्थ्याने मुदतीच्या आत परतफेड केल्यास त्याच्या व्यवसाय वाढीसाठी त्याला पुन्हा कर्ज रक्कम देण्यात येईल.

📢 हे पण वाचा :- शेतकऱ्यांना मागेल त्याला व हवे तेवढे पीक कर्ज एका क्लिकवर मिळणार, किसान क्रेडिट कार्ड योजनेला सुरुवात..!

आणखीन कोणत्या व्यवसायासाठी मिळू शकते कर्ज.

योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना व्यावसायिक वाहनांसाठी ज्यामध्ये चार चाकी प्रवासी वाहन, मिनी ट्रक, ट्रक, मालवाहू रिक्षा, इलेक्ट्रिक रिक्षा, ट्रॅक्टर व इतर कोणत्याही प्रवासो वाहनासाठी कर्ज पुरवठा करण्यात येईल. तसेच स्थानिक व्यवसायामध्ये किराणा दुकान, चहा वडापाव चे हॉटेल, भाजीपाल्याचे दुकान, इतर नाश्ता सेंटर, फास्ट पुढचे दुकान, चायनीज चे दुकान तर महिलांसाठी गिरणी, ब्युटी पार्लर फोटोग्राफी दुकान यांसारखी इतर कोणतीही छोटी व मध्यम स्वरूपाचे व्यवसाय करण्यासाठी योजनेअंतर्गत कर्ज स्वरूपात अर्थसहाय्य दिले जाईल.Shabari Adivasi Vikas Mahamandal.

Leave a Comment