SHASWAT SINCHAN YOJANA शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी व प्लास्टिक अस्तीकरण्यासाठी 40 कोटी रुपयांचा निधी मंजूर.

WhatsApp Group Join Now

SHASWAT SINCHAN YOJANA राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी चांगले सिंचन उपलब्ध व्हावे याकरता शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत शेततळे खांदण्यासाठी व त्याच्या इतर खर्चासाठी 40 कोटी रुपये पेक्षा जास्त रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे. व आवश्यक त्या जिल्ह्यांच्या यादीनुसार आवश्यक त्या शेतकऱ्यांना याचे वितरण करण्यामध्ये येणार आहे. तर मग काय आहे ही योजना आणि या योजनेअंतर्गत तुम्ही शेततळ्यांचा कसा लाभ घेऊ शकता याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखात जाणून घेऊया.

योजनेच्या अनुदानात वाढ.

कृषी विभाग मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेततळे वितरण करण्यास प्रयत्न करत आहे व या अंतर्गत कृषी विभागाने गेल्या वर्षी राज्य शासनाकडे शंभर कोटी रुपयांची मागणी केली होती व यावर्षी 40 कोटी रुपयांची मागणी केली आहे. व या दोन वर्षात आतापर्यंत 140 कोटी रुपये कृषी विभागाला राज्य शासनाकडून प्राप्त देखील झाले आहेत.SHASWAT SINCHAN YOJANA.

या योजनेची कार्यपद्धती.

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना अंतर्गत 2019 मध्ये पहिल्या टप्प्यात राज्यातील आवर्षणग्रस्त 14 जिल्ह्यांमधील 149 तालुक्यांचा याअंतर्गत समावेश करण्यात आला व या तालुक्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला. त्यानंतर 2021 मध्ये 107 तालुक्यांचा योजनेअंतर्गत समावेश करण्यात आला.

हे पण वाचा :- बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यामंत्रांची मंत्रिमंडळ बैठक ; मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा..!

या विभागात योजना चालू.

राज्याच्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांकरिता ही योजना लागू करण्यात आली व या योजनेअंतर्गत सध्या शेततळे खांदण्यासाठी व शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तीकरण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त 75 हजार रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती देण्यात येते.SHASWAT SINCHAN YOJANA.

शाश्वत योजनेतील इतर योजना.

मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना अंतर्गत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी 55 टक्के अनुदानस पूरक अनुदान 25% देऊन 80 टक्के अनुदान देण्यासाठी, व इतर शेतकऱ्यांना 45 टक्के अनुदान देण्यासाठी ठिबक व तुषार सिंचन योजनेसाठी अनुदान देण्यात येते.

तसेच या योजनेअंतर्गत हरितगृह उभारणीसाठी व शेडनेट ग्रहासाठी देखील एक लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते. तसेच यावर्षी मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत अर्थसंकल्प तरतुदीच्या 70 टक्के नीधीच्या मर्यादेत 350 कोटी रुपये निधी वितरणास मान्यता दिली आहे.SHASWAT SINCHAN YOJANA.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ..!

योजनेच्या अनुदान वितरणाची पद्धती.

मुख्यमंत्री शाश्वत योजना अंतर्गत शेततळ्यासाठी राज्य सरकारने यावर्षीच्या अर्थसंकल्पीय वर्षात एप्रिल 2023 मध्ये 50 कोटी रुपये ऑक्टोबर 2023 मध्ये 50 कोटी रुपयांच्या निधीचे वितरण करण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर पुन्हा कृषी आयुक्तालयाने निधी मागणीचे पत्र कृषी विभागाकडे पाठवले होते त्यामुळे आता पुन्हा एकदा 40 कोटी रुपयांच्या निधी वितरणास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. आणि ही मंजूर रक्कम महाडीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत असते.

Leave a Comment