Shetkari Apghat Vima Yojana शेतकरी अपघात विमा वाटपाला गति ; ८८९४ विम्याचे दावे मंजुर.

WhatsApp Group Join Now

Shetkari Apghat Vima Yojana या चालू वर्षामध्ये गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या दाव्यांसाठी विमा भरपाई चे वितरण करण्यासाठी दीडशे कोटी रुपयांचा निधी आयुक्तालयांकडे उपलब्ध झाला आहे व प्राप्त झालेल्या दाव्यांमधील शेतकऱ्यांना विमा भरपाई चे वितरण लवकरच केले जाणार आहे.

थकीत दाव्यांचे अनुदान प्रथमतः वितरित होणार.

अपघात विमा योजना यापूर्वी राज्यात दोन वेळा खंडित झाली होती व या काळामध्ये राज्यात शेतकऱ्यांचे व ऊसतोड मजुरांचे अपघाताचे दावे आयुक्तालयांकडे प्राप्त झाले. या काळात आयुक्तालयांकडे 2956 दावे प्राप्त झाले त्यांपैकी 2646 दावे मंजूर केले आहेत.व त्यांच्या कुटुंबाला 49.29 कोटी रुपयांची मदत करण्यात येणार आहे.Shetkari Apghat Vima Yojana.

हे पण वाचा :- आधार कार्ड काढणे, अपडेट करणे सर्व सुविधा आता पोस्ट ऑफिस मध्ये मोफत मिळणार..!

दुसऱ्या टप्प्यातील दावे देखील मंजूर.

राज्यात 2022 ते 2023 या दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील 3929 अपघाताचे दावे आयुक्तालयांकडे प्राप्त झाले होते. त्यापैकी 3264 दावे मंजूर करून त्यांच्या कुटुंबासाठी 47.12 कोटी रुपयांच्या अनुदानाचे वितरण करण्यात आले होते. अशाप्रकारे या दोन्ही टप्प्यातील प्राप्त झालेल्या दाव्यांसाठी एकूण 96.38 कोटी रुपयांचा निधी आतापर्यंत वितरित करण्यात आला आहे.

अपघात विमा योजनेच्या स्वरूपात बदल.

Shetkari Apghat Vima Yojana शेतकरी अपघात विमा योजनेचे स्वरूप 11 एप्रिल 2023 पासून थोडेसे बदलले आहे. या बदलासह या योजनेचे नवे नाव गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना असे आहे. या प्रमुख बदलासह योजनेसाठी तालुकास्तरावर अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये तालुका कृषी अधिकारी व तहसीलदार यांचा समावेश होतो. व अपघाताचे प्राप्त दावे पडताळून ते स्वीकारणे किंवा नकारणे याची संपूर्ण अधिकार समितीला देण्यात आल्याने दाव्यांचा निपटारा लागत आहे.

हे पण वाचा :- महिलांवर पैशांचा पाऊस ; महिलांना मिळणार हवे तेवढे कर्ज..!

अपघात सानुग्रह अनुदानासाठी यांच्याशी संपर्क करा.

संबंधित शेतकऱ्याला शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदानाचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या गावातील कृषी पर्यवेक्षकाची संपर्क साधावा लागेल, व त्यानंतर पर्यवेक्षकाकडून विमा अनुदानाचा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येतो. त्यांच्याकडून संबंधित प्रस्ताव पात्र किंवा अपात्र आहे हे संबंधित कुटुंबाला कळवले जाते. तसेच जर या प्रस्तावावर संबंधित कुटुंबाला आक्षेप असल्यास ते जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दाद मागू शकतात. Shetkari Apghat Vima Yojana.

Leave a Comment