SHETMAL TARAN KARJ YOJANA शेतमाल विकण्यास घाई करू नका ; शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्या..!

WhatsApp Group Join Now

SHETMAL TARAN KARJ YOJANA राज्यासह देशांमधील शेतकऱ्यांकडून शेतकऱ्याच्या शेतीमाला हमीभावाप्रमाणे भाव मिळावा यासाठी आंदोलने चालू आहेत. परंतु शेतकऱ्याला हमीभावाप्रमाणे भाव मिळत नसला तरी देखील शेतकरी शासनाच्या एका योजने नुसार आपल्या शेतमालावर तारण कर्ज घेऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्याला आपला शेतीमाल कमी भावात विकण्याची गरज पडणार नाही. तर मग काय आहे शेतमाल तारण कर्ज योजना आणि याचा शेतकरी कशाप्रकारे लाभ होऊ शकतात चला तर मग सविस्तरित्या आजच्या लेखात जाणून घेऊया.

काय आहे शेतमाल तारण कर्ज योजना.

शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असताना हा शेतमाल विक्री न करता बाजार समितीच्या गोदामात ठेवून, या शेतमालावर बाजार समितीकडून शेतकऱ्याला तारण कर्ज घेता येते. ज्यामुळे शेतकऱ्याचे पैशाची गरज पूर्ण होऊ शकते व नंतर शेतमालाला चांगला भाव आल्यास त्याची शेतकरी विक्री देखील करू शकतात.SHETMAL TARAN KARJ YOJANA.

हे पण वाचा :- वाळुसाठी ऑनलाइन अर्ज चालु ; या लोकांना मिळणार मोफत वाळू..!

तारण कर्ज योजनेची कार्यपद्धती.

SHETMAL TARAN KARJ YOJANA या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आपला शेतीमाल संबंधित बाजार समितीच्या गोदामात कारण म्हणून ठेवून या मालाची विक्री न करता शेतीमालावर कारण कर्ज घेता येते‌. कारण शेतमालाच्या एकूण किमतीच्या 75 टक्के रक्कम सहा महिन्यासाठी सहा टक्के व्याज दराने तारण कर्ज म्हणून संबंधित शेतकऱ्याला दिली जाते.

शेतमाल तारण कर्ज योजनेचे उद्दिष्य.

शेतमाल तारण कर्ज योजना ही राज्य शासनाच्या राज्य कृषी पणन महामंडळाच्या निर्देशानुसार राज्यात राबवण्यात येते. शेतकऱ्याकडून उत्पादित केलेला शेतमाल हंगामाच्या सुरुवातीला शेतकरी पैशाच्या निकडीमुळे बाजारपेठेत विक्रीसाठी आणतात. एकाच वेळेस बाजारात मोठी आवक झाल्यामुळे शेतमालाचे भाव पडतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते व हेच नुकसान रोखण्यासाठी शेतमाल तारण कर्ज योजना महत्वाची ठरत आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांनाआपला शेतिमाल न विकता पैश्याची तात्पुरती गरज भागवता येणार आहे. SHETMAL TARAN KARJ YOJANA.

हे पण वाचा :- दुष्काळसदृश्य जिल्ह्यातील मंडळांच्या याद्या आल्या ; मिळणार या अतिरिक्त सवलती..!

शेतकरी योजनेचा लाभ कसा घेऊ शकतात.

शेतमाल धारण कर्ज योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्याला आपल्या तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भेट द्यायची आहे. व योजनेविषयी विचारपूस करायचे आहे. व संबंधित बाजार समितीच्या माध्यमातून या योजनेचा लाभ घ्यायचा आहे.

 

Leave a Comment