राज्यात 100% अनुदानावर शिलाई मशीन व झेरॉक्स मशीन चे वाटप ; आजच अर्ज करा. Silai Machine Yojana 2024

WhatsApp Group Join Now

Silai Machine Yojana 2024 राज्यातील अनुसूचित जाती, जमाती, महिला व दिव्यांग या लाभार्थ्यांसाठी राज्य शासन अनेक प्रकारच्या योजना राबवते. व या योजना अंतर्गत या लाभार्थ्यांना पिठाची गिरणी, शिलाई मशीन, तूर डाळ प्रक्रिया मशीन व आता झेरॉक्स मशीन देण्यात येत आहे. त्यामुळे अशा लाभार्थ्यांच्या हाताला काम निर्माण होऊन त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल या उद्देशाने राज्य सरकार अशा प्रकारच्या योजना राबवते.

या महिलांना शिलाई मशीनचे वितरण.

Silai Machine Yojana 2024 राज्यातील आदिवासी, अनुसूचित जाती-जमाती, दिव्यांग व विधवा महिलांसाठी राज्य शासनाकडून शिलाई मशीनचे वाटप केले जात आहे. तसेच काही महिला बचत गटांना देखील राज्य शासनाकडून शिलाई मशीन वाटप करण्यात येत आहे.

📢 हे पण वाचा :- शेतकऱ्यांना ८५ % अनुदानावर दिले जाणार गिरणी ,रसवंती ,तार कुंपण व शेळी गट..!

राज्यात झेरॉक्स मशीनचे वाटप.

राज्यातील दिव्यांग महिला व पुरुषांना स्वावलंबी बनवण्यासाठी झेरॉक्स मशीनचे वितरण केले जाणार आहे. या योजनेसाठी राज्यातील समाज कल्याण विभागामार्फत अर्ज मागवण्यास सुरुवात झाली आहे. व लवकरच योजनेअंतर्गत च्या पात्र लाभार्थ्यांना ड्रॉ पद्धतीने झेरॉक्स मशीन चे वाटप करण्यात येणार आहे.

हे लाभार्थी घेऊ शकता योजनेचा लाभ.

महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग महिला पुरुष, मूकबधिर व अस्थिव्यंग प्रवर्गातील 50% व त्यापेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या महिला पुरुषांना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभाग अंतर्गत या योजनेचा लाभ देण्यात येत आहे. व यासाठी जिल्हास्तरावरील समाज कल्याण विभागाकडून अर्ज मागणीचे प्रस्ताव आले आहेत.Silai Machine Yojana 2024.

📢 हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! ठिबक सिंचन व तुषार सिंचनाचे ८० % अनुदान खात्यात जमा होण्यास सुरवात..!

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे.

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्याकडे प्रमुख ओळखपत्र ज्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मतदान कार्ड, अस्थिव्यंग व मूकबधिर दिव्यांगाचे प्रमाणपत्र, ग्रामसेवक यांचा रहिवासी पुरावा, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक,

लहान कुटुंबाचे ग्रामपंचायतचे स्वयंघोषणापत्र, शौचालय वापरत असल्याचे ग्रामपंचायत स्वयंघोषणापत्र, तहसीलदाराचे 90 हजार रुपये उत्पन्नाचे प्रमाणपत्र, ग्राम रोजगार सेवकाचे बेरोजगार प्रमाणपत्र व ग्रामसेवकाची उद्योगास ना हरकत असल्याचे प्रमाणपत्र सर्व कागदपत्रांसोबत तुम्हाला तुमच्या जिल्हास्तरीय समाज कल्याण विभागाकडे अर्ज सादर करायचा आहे.Silai Machine Yojana 2024.

Leave a Comment