SUGARCANE WORKERS ऊसतोड कामगारांना मोठा दिलासा ; अपघात विम्यास पाच लाख रुपये अनुदान.

WhatsApp Group Join Now

SUGARCANE WORKERS देशात सध्या ऊस तोडीचा हंगाम चालू आहे व महाराष्ट्र राज्यातून सर्वाधिक ऊसतोड कामगार हे बाहेर राज्यांमध्ये ऊस तोडी जात असतात. या ऊसतोड कामगारांच्या अपघाताबद्दल दररोज कोणत्या ना कोणत्या बातम्या न्युज पेपर आणि टिव्ही चैनल वर येत असतात. आणि आता अशाच ऊसतोड कामगारांसाठी राज्य शासनाने विम्याचे संरक्षण जाहीर केले आहे. जर कोणत्या घटनेतून ऊसतोड कामगाराचा मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास या कामगाराच्या वारसदारास राज्य शासनाकडून पाच लाख रुपये पर्यंत मदतीने येणार आहे.

ऊसतोड कामगारांना मोठा दिलासा.

SUGARCANE WORKERS आज पर्यंत कधीच ऊसतोड कामगारांना किंवा त्यांच्या वारसदारांना कोणत्याच प्रकारची मदत किंवा अनुदान दिले जात नव्हते परंतु शिंदे पवार फडणवीस सरकारने यावर्षी प्रथमच ऊसतोड कामगार, ऊस वाहतूक कामगार व मुकदम यांना अपघाती मृत्यू झाल्यास आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

हे पण वाचा :- आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी वाढली ; कापसाला विक्रमी भाव मिळण्याचे तज्ञांचे अंदाज..!

बीड जिल्ह्यात सर्वाधिक अपघाताच्या घटना.

बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो बीडमधून दरवर्षी लाखोच्या संख्येने कामगार हे बाहेर राज्यात ऊस तोडीसाठी जात असतात. व या कामगारांच्या अपघाताच्या व अपघाती मृत्यूच्या घटना सतत घडत असतात आणि आजपर्यंत सर्वाधिक अपघाती मृत्यू झालेले कामगार देखील बीड जिल्ह्यामधील आहेत. व या राज्य शासनाच्या निर्णयाद्वारे या ऊसतोड कामगारांच्या कुटुंबाला व वारसदारांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.SUGARCANE WORKERS.

राज्य सरकारचा आणखीन एक मोठा निर्णय.

SUGARCANE WORKERS राज्यातील ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली व या मंडळा अंतर्गत ऊसतोड कामगारांसाठी विविध योजना राबवल्या जातात. आणि याच मंडळ अंतर्गत या कामगारांच्या अपघाती मृत्यूसाठी विम्याचा प्रस्ताव आहे परंतु अद्याप ही योजना सुरू झाली नसल्यामुळे तोपर्यंत या कामगारांना तातडीने पाच लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत राज्य शासनाच्या अंतर्गत देण्यात येत आहे.

हे पण वाचा :- प्रत्येकाचे घराचे स्वप्न होणार पूर्ण ; आता मागेल त्याला घरकुल, नवीन याद्या आल्या..!

जिल्हा निहाय मंजूर प्रस्तावाची संख्या.

महाराष्ट्र राज्यांमधून सर्वाधिक ऊसतोड कामगार हे बीड जिल्ह्यातून बाहेर राज्यात कामास जात असल्यामुळे आतापर्यंत सर्वाधिक कामगारांच्या अपघाताच्या घटना देखील बीड जिल्ह्यात झाले आहे आणि त्यामुळेच बीडमधून 31 कामगारांचे प्रस्ताव मंजूर केले आहेत तर अहमदनगर मधून 23 धाराशिव जिल्ह्यातील 7 तर पुणे जिल्ह्यातील 3 आणि जालना जिल्ह्यातून देखील 3 प्रस्ताव मंजूर केले आहेत.

अशा अपघातांनाच मदत मिळते.

राज्य शासनाकडून ऊसतोड कामगारांना देण्यात येणारी आर्थिक मदतीसाठी जर रस्ते अपघात, रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, विजेचा धक्का लागून मृत्यू तसेच काम करत असताना सर्पदंश, विंचू दंश, जनावरांनी टक्कर मारणे, कुत्र्याने चावा घेणे, रेबीज किंवा कोणत्याही पाळीव प्राण्याने जखमी करून किंवा चावा घेऊन मृत्यू झाल्यास आर्थिक मदत दिली जाते.SUGARCANE WORKERS.

Leave a Comment