Surya Ghar Yojana “पीएम सूर्यघर” योजनेअंतर्गत 1 कोटींपेक्षा जास्त कुटुंबांना मिळणार मोफत वीज ,आजच अर्ज करा.

WhatsApp Group Join Now

Surya Ghar Yojana देशातील एक कोटींपेक्षा जास्त कुटुंबांना मोफत देण्यासाठी केंद्र सरकारने पीएम सूर्य घर योजना जाहीर केले आहे. व या योजनेअंतर्गत देशातील वीज ग्राहकांना सौर ऊर्जेद्वारे वीजपुरवठा करून देशात उद्भवत असलेला प्रदूषणाचा प्रश्न व देशाला सोलार एनर्जी मध्ये आत्मनिर्भर बनवण्याचे लक्ष यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचे घोषणा करून आता अंमलबजावणी देखील चालू केली आहे.

कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये योजनेला मंजुरी.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 फेब्रुवारी 2024 रोजी पीएम सूर्य घर योजना जाहीर केली. व काल पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळ बैठक पार पडली. व या बैठकीमध्ये ही योजना देशभर राबवण्यासाठी 75 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.Surya Ghar Yojana

हे पण वाचा :- शेतकऱ्यांना ८५ % अनुदानावर दिले जाणार गिरणी ,रसवंती ,तार कुंपण व शेळी गट..!

अशाप्रकारे राबवली जाणार योजना.

Surya Ghar Yojana देशातील वीज ग्राहकांना या योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या सोलार पॅनलच्या खर्चासाठी 60% रकमेची सबसिडी दिली जाणार आहे. व इच्छुक ग्राहकांना उर्वरित रकमेसाठी राष्ट्रीयकृत बँकेमधून 7 टक्के दराने कर्ज देखील उपलब्ध करून दिले जाणार आहे.

योजनेअंतर्गतची अनुदान वितरण पद्धत.

पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत २ किलोवॅट क्षमतेच्या प्रणालीसाठी येणाऱ्या खर्चाच्या 60 टक्के अनुदान तर २-३ किलोवॅट क्षमतेच्या उभारणीसाठी अतिरिक्त 40 टक्के केंद्रीय अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. सध्याच्या केंद्र शासनाच्या आकडेवारीनुसार 1 किलो वॅट क्षमतेचा सोलर साठी 30000 रुपये अनुदान तर दोन किलो वॅट क्षमतेच्या सोलर साठी 60000 रुपये अनुदान तर 3 किंवा 3 पेक्षा जास्त किलोवॅट क्षमतेच्या सोलर साठी 78000 रुपयांचे केंद्रीय अनुदान वीज ग्राहकांना दिले जाणार आहे.Surya Ghar Yojana

हे पण वाचा :- या कारणांमुळे तुम्हाला हप्त्याचे पैसे मिळाले नाही ; फक्त एक काम करा व मिळवा 6000 रुपये..!

योजनेसाठीची कागदपत्रे व अर्जपद्धती.

या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असणाऱ्या लाभार्थ्यांकडे त्यांचे चालू विज बिल आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र व इतर अधिकृत कागदपत्रांसोबत https://pmsuryaghar.gov.in या पीएम सौरघर योजनेच्या राष्ट्रीयकृत पोर्टलवर नोंदणी करून अर्ज सादर करायचा आहे. यानंतरची पुढील प्रक्रिया करून योजनेचा लाभ घेता येईल.

Leave a Comment