today cotton price अखेर कापसाचे भाव वाढले ; या बाजार समितीमध्ये आज कापसाचे भाव 1200 रुपयांनी वाढले.

WhatsApp Group Join Now

today cotton price गेल्या तीन ते चार महिन्यापासून दबावात विक्री होत असलेल्या कापूस दरात या महिन्यापासून दरात चढ-उतार होत होता. व आता गेल्या पंधरा दिवसांमध्ये कापूस दरात हलकीशी सुधारणा पाहायला मिळुन आज चक्क परभणीतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापूस दर 1200 रुपयांनी वाढले. तर मग राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सध्या कापसाला काय भाव मिळत आहे, व कापूस दरामध्ये अजून किती सुधारणा होऊ शकते याबद्दलचा बाजारभाव तज्ञ लोकांचा अंदाज आजच्या लेखात सविस्तरपणे जाणून घेऊया.

कापूस दरात चांगलीच सुधारणा.

today cotton price इतर देशाच्या तुलनेमध्ये भारतीय कापूस स्वस्त असल्यामुळे आणि भारतीय कापसाचा धागा अधिक मजबूत व उत्तम दर्जाचा असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भारतीय कापसाला मागणी वाढली आहे. परंतु राज्यातील शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक नसल्यामुळे बाजार समितीमध्ये कापूस आवक देखील घडली आहे. याचाच परिणाम मागील आठ दिवसापासून बाजार समितीमध्ये दररोज 300 ते 400 रुपयांनी कापूस दर सुधारत असून आज चक्क 1200 रुपयांनी कापूस दरात सुधारणा पाहायला मिळाली.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांना काल एकत्र 6000 रुपये जमा झाले ; पहा तुमचे पैसे कधी आणि कसे जमा होणार..!

या शेतकऱ्यांना दरवाढीचा मोठा फायदा.

मागील महिन्यांमध्ये राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचा कापूस झाडाला भिजला. भिजलेल्या कापसाची रेनटच अशी प्रतवारी काढून बाजार समितीने 5300 ते 5500 रुपयापर्यंत या कापसाची खरेदी केली. परंतु सध्याच्या शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे व त्यांनी कापूस विक्री करणे टाळले अशा शेतकऱ्यांना या दरवाढीचा मोठा फायदा होत आहे.today cotton price.

या बाजार समितीमध्ये कापूस प्रतिक्विंटल मागे 1200 सुधारला.

राज्यातील प्रमुख बाजार समिती असलेल्या परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापूस खरेदी दरात 1000 ते 1200 प्रतिक्विंटल सुधारणा झाली आहे. तसेच परभणी नजीकच्या सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला किमान 6500 ते कमाल 8000 तर सर्वसाधारण 7310 रुपये भाव पहायला मिळाला.

हे पण वाचा :- राज्यात अवकाळी पावसाचा धुमाकूळ ; पुढील दोन दिवस या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा..!

कापूस भाव आणखीन किती वाढतील.

बाजारातील बाजार भाव तज्ञ लोकांच्या मते जर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची मागणी अशाच प्रकारे वाढत राहिली तर शेतकऱ्यांकडे उर्वरित शिल्लक असलेल्या कापसाला 10000 रुपये प्रतिक्विंटल पर्यंत देखील भाव मिळू शकतो. परंतु शेतकऱ्यांना देखील टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.today cotton price.

राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील आजचे कापूस दर.

बाजार समिती  आवक  किमान दर  कमाल दर  सर्वसाधारण दर 
अकोला  534 6964 7488 7988
परशिवानी  633 6964 7244 7677
कटोल  855 6800 7535 7988
अमरावती  632 7898 7953 8214
परभणी  745 7655 7899 8132

Leave a Comment