Todays Chana Market Rate बाजारात हरभऱ्याची आवक कमी ; सध्या हरभऱ्याला हमिभावापेक्षाही जास्त भाव ,पहा आजचे बाजारभाव.

WhatsApp Group Join Now

Todays Chana Market Rate राज्यातील बाजार समिती चालू रब्बी हंगामातील नवीन हरभऱ्याची आवक होत आहे. व या नवीन हरभऱ्याला हमीभावापेक्षा चांगला भाव देखील पाहायला मिळत आहे. हंगामाच्या सुरुवातीला राज्यात हरभऱ्याचे दर दबावात होते परंतु सध्या कापूस तूर व थोड्याफार प्रमाणात सोयाबीनच्या दरात देखील सुधारणा आढळून येत आहे. तसेच यावर्षी हरभऱ्याचे क्षेत्र म्हटल्यामुळे हरभऱ्याचे उत्पन्न कमी राहील व बाजार समितीमध्ये हरभऱ्याला अत्यंत चांगल्या प्रकारचा भाव मिळेल असा अंदाज बाजारातील तज्ञ लोकांनी व्यक्त केला आहे.

हरभऱ्याला मिळणार आज पर्यंतचा सर्वोच्च भाव.

Todays Chana Market Rate यावर्षी राज्यात कमी पर्जन्यमान राहिल्यामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला. तसेच रब्बी हंगामातील पिकांना पेरणीच्या सुरुवातीपासूनच पाणी न मिळाल्यामुळे उत्पन्नात घट होऊन लागवडीचे क्षेत्र देखील कमी राहिले. याचाच परिणाम यावर्षी रब्बी हंगामात रब्बी हंगामातील पिकांची आवक कमी आहे व याचाच परिणाम हरभऱ्याला आजपर्यंतचा सर्वोच्च भाव मिळू शकतो.

हे पण वाचा :- “पीएम सूर्यघर” योजनेअंतर्गत 1 कोटींपेक्षा जास्त कुटुंबांना मिळणार मोफत वीज ,आजच अर्ज करा..!

हरभऱ्याला हमीभावापेक्षा जास्त भाव मिळणार.

सध्या देशातील कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश व हरियाणा या राज्यांमध्ये नवीन हरभऱ्याची आवक सुरू आहे. व सध्या या नवीन हरभऱ्याला 5500 पाचशे ते 6100 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळत आहे. किरकोळ बाजारात देखील हरभरा व हरभऱ्याची डाळ 60 ते 65 रुपये प्रति किलो दराने विक्री होत आहे.Todays Chana Market Rate.

हरभरा भाव वाढीला कशाचा आधार आहे.

हरभऱ्याच्या उत्पन्नात घट झाली असून, देशात पुढील काळात असलेल्या रमजान व होळी या सणामुळे हरभरा व हरभऱ्याच्या डाळीची मागणी वाढणार आहे. व सरकारकडे हरभरा व डाळीचा स्टॉक कमी असल्यामुळे सरकार आणि उद्योग देखील हरभरा खरेदीत उतरतील.

पुढील काळात हरभऱ्याचा बाजार कसा राहू शकतो.

सरकारने मागील काही काळात हरभऱ्याचा स्टॉक विकला व त्यामुळे सरकार आणि उद्योगाकडे हरभऱ्याचा स्टॉक सध्या कमी आहे. सरकारमुळे देशामधील उद्योगधंद्यांनीही हरभऱ्याचा मोठा स्टॉक केला नाही त्यामुळे आता नवीन हरभऱ्याची बाजारात आवक होत असताना सरकार व उद्योग नवीन हरभरा खरेदी करण्यासाठी बाजारात उतरतील. त्यामुळे भविष्यात 5700 ते 6100 रुपये प्रतिक्विंटल पर्यंत साधारणता हरभऱ्याचे भाव राहतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.Todays Chana Market Rate.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांना ८५ % अनुदानावर दिले जाणार गिरणी ,रसवंती ,तार कुंपण व शेळी गट..!
राज्यातील बाजार समिती मधील आजचे हरभऱ्याचे बाजार भाव.
बाजार समिती  आवक  किमान दर  कमाल दर  सर्वसाधारण दर 
परशिवानी  324 5477 5755 5877
अकोट  633 5433 5866 5932
अकोला  522 5788 5433 5986
धाराशिव  134 5261 5433 5743
परभणी  322 4964 5267 5455
मानवत  1324 4900 5287 5566

 

Leave a Comment