Todays cotton rate कापुस दरात तुफान तेजी ; पहा आजचे बाजार समित्यांमधील कापसाचे भाव.

WhatsApp Group Join Now

Todays cotton rate राज्यात हंगामाच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्यामुळे राज्यातील प्रमुख पीक असलेल्या कापूस या पिकाच्या उत्पन्नावर परिणाम झाला. राज्यात कापसाचे क्षेत्र घटल्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या कापूस दराची अपेक्षा होती, परंतु हंगामाच्या सुरुवाती पासूनच कापूस दर दबावत होते. व आता मागील पंधरा दिवसांमध्ये कापूस दरात सुधारणा होत असून कापूस दराने आठ हजार रुपये प्रति क्विंटल कडे वाटचाल सुरू केली आहे.

कापूस भाव वाढले पण कापुस संपला.

भारतीय कापूस इतर देशाच्या तुलनेत स्वस्त असल्यामुळे त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढत आहे व यामुळेच मागील पंधरा दिवसात कापूस दरात सुधारणा आढळून येत आहे. सध्या राज्यातील बाजार समितीमध्ये कापूस दरात सुधारणा होत असली तरी शेतकऱ्यांकडे कापूस मात्र संपत आला आहे.

हे पण वाचा :- अखेर राज्य सरकारने जाहीर केले की, नमोचा दुसरा हाप्ता 6000 रुपयांचाच मिळणार..!

जागतिक बाजारात कापूस तेजीत.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दर तेजीत असून, कापसाला सध्या 70 ते 75 हजार रुपये प्रतिखंडी असा आहे‌. आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत देशात सध्या कापसाला 58 ते 60 हजार रुपये प्रतिखंडी दर पाहायला मिळत आहे. व याचा परिणाम देशातील बाजार समित्यांवर देखील आठवण येत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाचे दर.

आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात तेजीचे वातावरण आहे, आंतरराष्ट्रीय बाजारात 90 ते 95 प्रति सेंट असलेला कापसाचा दर 1 डॉलर 2 सेंटच्या आसपास पोहोचला आहे. रशिया-युक्रेन‌ व इजराइल-गाझा यांच्या युद्धामुळे कापसाची जागतिक बाजारातील निर्यात प्रभावी झाली होती. व या देशातील शांततेमुळे पुन्हा एकदा कापसाची मागणी वाढून दरात सुधारणा होत आहे.

हे पण वाचा :- आजचे मंत्रिमंडळ निर्णय ; धान बोनस जाहीर,अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजुर,नमोचा हाफ्ता आला..!
पहा आजचे बाजार समितीमधील कापसाचे दर.
बाजार समिती  आवक  किमान दर  कमाल दर  सर्वसाधारण दर 
सोनपेठ  344 7500 7900 7989
सावनेर  5433 6900 7500 7900
रालेगांव  877 7100 7800 8100
भद्रावती  322 7663 7863 8129
धारनी  988 7477 7944 8133
परभणी  200 6588 7322 7699
उमरेड  543 7122 7362 7934
अकोला  145 6894 7644 7899
वरोरा  367 7233 7455 7988
मानवत  672 7133 7699 8233
काटोल  689 6899 7322 8433

Leave a Comment