Todays cotton rate कापुस दरात पुन्हा सुधारणा ; या बाजार समितीमध्ये कापसाला आज ८००० भाव.

WhatsApp Group Join Now

Todays cotton rate शेतकऱ्यांसाठी प्रमुख पीक असलेल्या कापूस पिकाचे भाव मागील काही दिवसापासून दबावात होते. परंतु मागील दोन दिवसांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सीसीआयने कापूस खरेदी सुरू केल्यामुळे बाजार समितीमध्ये देखील कापूस दरात सुधारणा झाली आहे. त्यामुळेच काल राज्यातील या बाजार समितीमध्ये कापसाला आठ हजार रुपयांपर्यंत भाव पाहायला मिळाला. तर मग कोणत्या बाजार समितीमध्ये कापूसदर वाढली आहेत आणि कधीपर्यंत हे तर टिकून राहतील व महत्त्वाचे म्हणजे आज आपल्या जवळपासच्या बाजार समितीत कापसाला काय भाव मिळाला हे सविस्तरपणे आज या लेखात जाणून घेऊया.

कापूस दरात पुन्हा सुधारणा.

राज्यातील बाजार समितीमध्ये तूर या पिकाला बारा हजार रुपयांपर्यंत भाव मिळत आहे परंतु शेतकऱ्यांचे प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन आणि कापूस या पिकांचे बाजारभाव वाढण्याचे नाव घेत नव्हते, परंतु बाजार समिती पुन्हा एकदा कापूस दरात सुधारणा होत आहे आणि यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.

हे पण वाचा :- ११ कोटी लाभार्थ्यांना ४००० रुपयांचा हप्ता या दिवशी जमा होणार; केंद्र सरकारची मोठी घोषणा..!

तेरा वर्षानंतर सीसीआय ची कापूस खरेदी.

राज्यात तब्बल तेरा वर्षानंतर सीसीआयने कापूस खरेदी सुरू केली आहे. राज्यातील हिंगोली जिल्ह्यांमध्ये असलेल्या सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्र वर काल कापूस खरेदी करण्यात आली. पहिल्याच दिवशी कापूस केंद्रावर ३५० क्विंटल पेक्षा जास्त कापूस खरेदी केला गेला. या कापसाला प्रतिक्विंटल सहा हजार नऊशे रुपयांच्यावर भाव पाहायला मिळाला.

सीसीआय कापूस खरेदीसाठीच्या अटी.

राज्यातील सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्याला कापूस विक्री करायचा असल्यास त्यांच्या काही अटी आणि शर्ती आहेत. यामध्ये सर्वप्रथम अट अशी आहे की, शेतकऱ्याच्या सातबारावर कापूस पिकाची नोंद असायला हवी. तसेच सीसीआय प्रति शेतकरी 12 क्विंटल च्या मर्यादेमध्ये कापूस खरेदी करते. आणि महत्वाचे म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे नाहीतर तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यास अडचणी निर्माण होतात.

हे पण वाचा :- अवकाळी पावसाने झोडपले ; पुढील दोन दिवस या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह अवकाळीचा इशारा..!

आजचे बाजार समित्यांमधील कापसाचे दर.

बाजार समिति आवक किमान दर कमाल दर सर्वसाधारण दर
अकोट 5000 6670 6988 7011
मरेगांव 1450 6555 6744 6503
पारशिवानी 730 6400 6575 7100
कल्मेश्वर 1499 6200 6700 6500
अकोला 34 6700 6900 7800
उमरेड 123 6900 7200 7932
वरोरा 2770 6500 6633 6944

Leave a Comment