Todays Golden Price लग्नसराईच्या तोंडावर सोने झाले स्वस्त ; सोन्याच्या दरात 1000 रुपयांपर्यंत घट.

WhatsApp Group Join Now

Todays Golden Price सोन्याची खरेदी करू इच्छित असणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण की लग्न करायचं तोंडावर सोन्याचे दर हलकेसे कमी झाले आहेत. या लग्नसराईच्या अगोदर एक हजार रुपये पर्यंत सोन्याच्या दरात घट झाली आहे‌. तर मग सध्या सोन्याचा चालू दर काय आहे, आणि हाच भाव किती दिवस राहील संपूर्ण आणि सविस्तरित्या आजच्या लेखात जाणून घेऊया.

सोन्याच्या दारात घसरण सुरू.

एक जानेवारीला 24 कॅरेट ( प्रति दहा ग्राम सोने ) 63 हजार 600 रुपये होते तर 22 कॅरेट सोने 59 हजार 200 रुपये प्रति दहा ग्रॅम होते. आता या सोन्यात घट होऊन प्रति दहा ग्राम 62 हजार 600 आणि 58 हजार 300 रुपयांपर्यंत झाले आहे.

सोन्याच्या दारात चढउतार कायम.

1 ऑगस्ट 2023  रोजी 24 कॅरेट प्रति दहा ग्राम सोने 59 हजार 900 रुपये होते तर त्यानंतर सोन्याच्या दरात टप्प्याटप्प्याने घसरण होत गेली व सोन्याचे दर प्रति दहा ग्राम 57 हजार रुपयांपर्यंत खाली आले. सोन्याच्या दारात पुन्हा ऑक्टोबर महिन्यात सुधारणा झाली व 24 कॅरेट प्रति दहा ग्रॅम सोन्याचे भाव 59 हजार ते 60 हजार रुपयांपर्यंत झाले. आणि सोन्याच्या घरात जानेवारी महिन्यापर्यंत अशीच दरवाढ होत राहिली.

हे पण वाचा :- सोयाबीनची मागणी वाढली ; सोयाबीन पुन्हा एकदा 6000 रुपये क्विंटल विक्री होणार-कृषिमंत्री..!

चांदी देखील थेट चार हजार रुपयांनी स्वस्त.

सोन्याच्या दरात घसरण सुरू असताना चांदीचे दर देखील थेट चार हजार रुपयांनी स्वस्त झाले आहेत. 1 जानेवारी 2023 रोजी चांदी प्रति किलो 74 हजार 600 रुपये होता. त्यात 3 हजार 960 रुपयांची घट होऊन, चांदी 70 हजार 640 रुपये प्रति किलो पर्यंत पहायला मिळत आहे.

कधीपर्यंत राहतील सोने-चांदीचे दर स्वस्त.

सध्या सोन्या चांदीचे दर कमी होण्यामागे कोणतेच विशेष कारण नाही. सोने चांदीच्या मार्केटच्या स्थितीनुसार एक ते दोन टक्के दर कमी जास्त होत असतात. व यापुढे काळामध्ये लग्नसराई सुरू होत असल्यामुळे सध्या सोन्या-चांदीची खरेदी करण्यासाठी विशेष संधी आहे.

हे पण वाचा :- वाळु धोरणात बदल ; आता 600 रुपये ब्रास नाही तर 2000 रुपये ब्रासने मिळणार वाळु..!
या महिन्यातील सोन्याच्या दरातील फरक.
तारीख  24 कॅरेट सोन्याचे भाव  ( प्रति दहा ग्राम सोने )  22  कॅरेट सोन्याचे भाव ( प्रति दहा ग्राम सोने ) 
1  जानेवारी 2023  63 हजार 600 रुपये 59 हजार 200 रुपये
1 ऑगस्ट 2023 59 हजार 900 रुपये 57 हजार 400 रुपये
1 फेब्रुवारी 2024  62 हजार 600 रुपये 61 हजार 300 रुपये

 

Leave a Comment