बाजारात सोयाबीनच्या अवकेत घट ; एप्रिल महिन्यात सोयाबीन 6000 रुपये प्रति क्विंटलने विक्री होणार. Todays Soyabean Bajarbhav

WhatsApp Group Join Now

Todays Soyabean Bajarbhav देशांतर्गत सोयाबीन बाजार सोयाबीन हंगामाच्या सुरुवातीपासूनच दबावात आहे. बाजारात हंगामातील नवीन सोयाबीन विक्रीस आली तेव्हा सोयाबीनला 5000 हजार रुपये प्रति क्विंटल यावर भाव मिळत होता. परंतु त्यानंतर सोयाबीनचे भाव पडले व पुन्हा सोयाबीन दरात सुधारणा झाली नाही.

सोयाबीन बाजाराची सद्यस्थिती.

देशातील सोयाबीन बाजारात ऑक्टोबर 2023 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये बाजारात सोयाबीनची आवक कमी झाली, सोयाबीनचे गाळप कमी झाले व सोयाबीन निर्मिती देखील कमी झाली व साधारणतः आंतरराष्ट्रीय पातळीवर सोयाबीनची मागणी कमी राहिल्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचे भाव सर्वसाधारण आहेत.Todays Soyabean Bajarbhav.

📢 हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! फळबाग लागवडीसाठी आणखीन 50 कोटी तर सर्वसामान्य प्रवर्गासाठी 20 कोटी मंजूर..!

सोयाबीन उत्पादकांची मोठी निराशा.

यावर्षी खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने मोठा खंड दिल्यामुळे शेतकऱ्याला पेरणी करण्यास विलंब झाला त्यामुळे राज्यात सोयाबीनचे क्षेत्र घटले व सोयाबीनच्या उत्पन्नामध्ये देखील घट पाहायला मिळाली. ही नवीन सोयाबीन बाजारात विक्रीस आली त्यावेळेस 5000 ते 5500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत विक्री होत होती व शेतकऱ्याला 6000 रुपये प्रतिक्विंटल पर्यंत सोयाबीनला भाव मिळण्याची अशा होती.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनला मागणी नाही.

Todays Soyabean Bajarbhav देशातील तेल निर्मिती उद्योगांकडून आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील व्यापाऱ्यांकडून भारतीय सोयाबीनला सध्या मागणी कमी असल्यामुळे सोयाबीनचे दर स्थिर आहेत. तर दुसरीकडे शेतकऱ्यांनी सोयाबीनचा स्टॉक करून ठेवल्यामुळे बाजारात सोयाबीनचे आवक कमी झाली आहे. या शेतकऱ्यांना आणखीन देखील सोयाबीनचे भाव वाढण्याची मोठी आशा आहे.

📢 हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज..! रेशीमला मिळत आहे ५३ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव व तुती लागवडीसाठी अनुदान..!

सोया पेंड निर्मिती मध्येही घट.

देशांतर्गत तेलाचे दर स्थिर आहेत, तर चालू वर्षामध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत सोयाबीन निर्मिती तीन लाख टणांनी कमी झाली तर दुसरीकडे देशांतर्गत वापरही सव्वा लाख टणांनी कमी होऊन 29 लाख टनांवर स्थिरावला आहे. अशा प्रकारची आकडेवारी ‘सोपा’ने या महिन्यात जाहीर केली आहे.

आजचे राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनचे बाजार भाव.
बाजार समिती  आवक  किमान दर  कमाल दर  सर्वसाधारण दर 
अकोट  644 3984 4241 4132
अकोट  638 4162 4211 4132
परशिवनी  893 3978 3999 4127
धानोरा  142 3788 3974 3988
पुलगांव  538 3984 4123 4211
धाराशिव  311 3764 3843 3978
मानवत  25 3748 3974 4121

Leave a Comment