Tractor anudan yojana शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ.

WhatsApp Group Join Now

Tractor anudan yojana शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या ट्रॅक्टरसाठी सरकार शेतकऱ्यांना अनुदान देत असते. आणि यासाठी राज्य सरकार अंतर्गत भरपूर साऱ्या योजना राबवण्यात येत असतात. राज्यातील शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करण्यास आता मुदतवाढ देण्यात आली आहे. तर मग या योजनेत तुम्ही अर्ज कसा करू शकता यासाठी पात्रता अटी काय आहेत याबद्दलची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आजच्या या लेखात जाणून घेऊया .

 ट्रॅक्टर योजनेसाठी ९० टक्के अनुदान.

Tractor anudan yojana राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या अंतर्गत राज्यातील अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध घटकातील शेतकऱ्यांसाठी मिनी ट्रॅक्टर व त्याच्या उपसाधनासाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. आणि या शेती उपयोगी अवजारांसाठी आणि ट्रॅक्टर साठी राज्य शासना अंतर्गत 90% पर्यंत अनुदान देण्यात येते.

या साधनांसाठी मिळणार अनुदान.

शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी लागणाऱ्या ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर सोबतच्या उपसाधनामध्ये रोटर, कल्टीवेटर, ट्रेलर, नांगर, मोगडा, पेरणी यंत्र व माळनीयंत्र यांचा शेती उपयोगी साधनांसाठी राज्य शासनांमार्फत अनुदान देण्यात येते.

हे पण वाचा :- प्रत्येक कुटुंबाला 300 युनिट पर्यंत मोफत वीज ; केंद्र सरकारची नवीन योजना..!

योजना व योजनेमागील उद्दिष्ट.

राज्यातील अनुसूचित जाती जमाती व नवबौद्ध घटकातील बचत गटातील शेतकऱ्यांसाठी 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर, रोटर, कल्टीवेटर यांसारखे उपसाधने यांचा पुरवठा करण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे.Tractor anudan yojana.

योजनेसाठीच्या अटी व शर्ती.

अनुसूचित जाती जमाती नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटातील शेतकरी हे महाराष्ट्र राज्याचे स्थायी नागरिक असायला हवे.

तसेच संबंधित स्वयंसहायता बचत गटातील 80 टक्के सदस्य हे अनुसूचित जाती जमाती व नव बौद्ध घटकातील असावे व बचत नवबौद्ध घटकातील असावेत.

तसेच स्वंयसहायता बचत गटातील अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव हे देखील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील असावेत.

ट्रॅक्टर व त्याचे उपसाधने खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या संबंधित अधिकृत कागदपत्रांचे संबंधित शेतकऱ्याला पूर्तता करावी लागेल.

योजनेसाठी ठरवून दिलेल्या उद्दिष्ट्यांपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास बचत गटाची निवड लॉटरी पद्धतीने करण्यात येईल.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांना पाईपलाईन साठी 90 टक्के अनुदान, अनुदानात वाढ ; आजच अर्ज करा..!

योजनेचे अनुदान व अनुदान पद्धत.

योजनेअंतर्गत ट्रॅक्टर व ट्रॅक्टरच्या उपसाधनाच्या खरेदीसाठी 90 टक्के अनुदान किंवा 3.15 लाख रुपये जास्तीत जास्त अनुदान देण्यात येईल.
तसेच शेतकऱ्याला या व्यतिरिक्त अतिरिक्त साधने खरेदी करायचे असल्यास अतिरिक्त रक्कम स्वतः शेतकऱ्याला भरावी लागेल.

कागदपत्रे व अर्ज पद्धती.

योजनेचा लाभ घेण्यासाठी सतत वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या समाज कल्याण कार्यालयाच्या माध्यमातून जाहिरात काढण्यात येतात.व त्या अंतर्गत इच्छुक लाभार्थ्याला त्यांच्या संबंधित समाज कल्याण कार्यालयाकडे अर्ज सादर करावा लागतो. Tractor anudan yojana.
योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो त्यासाठी mini.mahasamajkalyan.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करायचा आहे.
ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करून अर्ज सादर केलेली प्रत संबंधित समाज कल्याण कार्यालयामध्ये जमा करायचे आहे.

Leave a Comment