Tur market rate :- तुरीचे दर गगनाला भिडले ; तुरीला 11000 रुपयांपर्यंत भाव.

WhatsApp Group Join Now

Tur market rate :- राज्यातील बाजार समितीमध्ये कापूस सोयाबीन मका आणि इतर पिकांचे दर स्थिर असताना तुरीच्या दरामध्ये दिवसेंदिवस सुधारणा पहायला मिळत आहे. काल राज्यातील प्रमुख बाजार समितीमध्ये तुरीचे दर दहा हजार रुपयांच्या वर सरकली असून काही बाजार समिती अकरा हजार रुपये पर्यंत तुरीला भाव पाहायला मिळाला तर मग आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीला काय दर मिळत आहे व तुरीचे दर आणखीन किती वाढू शकतात व आज तुरीला काय भाव मिळाला सविस्तरपणे जाणून घेऊया.

बाजार समितिमध्ये तुरीची आवक घटली  :-

यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला बाजार समितीमध्ये तुरीची आवक मोजकी होती आणि तुरीला आठ हजार पाचशे ते नऊ हजार रुपया पर्यंतचा बाजार भाव मिळत होता परंतु डिसेंबर महिन्याच्या शेवटी व जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला राज्यात तुरीच्या थरामध्ये सुधारणा होऊन तर हे दहा हजार रुपयांच्या वर सरकले या एक ते दीड महिन्याच्या काळामध्ये बाजार समितीमध्ये तुरीच्या दरात तब्बल दोन हजार रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली. Tur market rate.

सोयाबीनच्या दरात घसरण कायम :-

दुसरीकडे सोयाबीनच्या दरामध्ये मात्र काहीच सुधारणा होताना आढळून येत नाहीये, सोयाबीनचे दर हंगामाच्या सुरुवातीला 5100 ते 5200 रुपयांवर होते ते दर डिसेंबर महिन्यामध्ये 4500 रुपयांवर आले व सध्या तर बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4000 रुपया पर्यंतचा दर मिळत आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी मोफत परदेश दौरा ; जाण्यासाठी लगेच अर्ज करा..!
तुरीचे दर आणखीन वाढण्याची शक्यता  :-

एकीकडे राज्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन आणि कापूस यांच्या दरात घसरण चालू आहे, तर दुसरीकडे तुरीचे दर दिवशें दिवस गगनाला भिडत आहेत. राज्यातील प्रमुख बाजार समिती असलेल्या छत्रपती संभाजी नगर मध्ये तुरीचे दर सुधारण्याचा ट्रेंड कायम आहे. व आणखीन ही तुरीच्या दरामध्ये सुधारणा होऊ शकते असा अंदाज बाजारातील बाजारभाव तज्ञांनी वर्तवला आहे. Tur market rate.

बाजार समितिमध्ये तुरीचे दर 10000 पार :-

खानदेश, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र मध्ये तुरीचे अधिक उत्पन्न घेतले जाते आणि या भागात कमी पर्जन्यमान आणि हवामान बदलामुळे मनावर तसेच तुरीचे उत्पन्न मिळाले नाही आणि त्यामुळेच बाजार समितीमध्ये तुरीची आवक कमी राहिली व याचा परिणाम तुरीच्या दरवाढीमध्ये दिसून येत आहे. या दरवाढीमुळे सध्या तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

हे पण वाचा :- या जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांसाठी 322 कोटी रुपये अनुदान मंजूर ; यादीमध्ये नाव पहा..!

तसेच शेतकऱ्यांकडून अशी देखील मागणी करण्यात येत आहे की सरकारने तुरीची आयात करू नये कारण शेतकऱ्याच्या कांदा, सोयाबीन, मका आणि कापूस या पिकांचे भाव स्थिर असल्यामुळे तुरीच्या पिकांमधून शेतकरी उत्पन्नाची भरपाई करू शकतो. त्यामुळे जर सरकारने तुरीची आयात केली नाही तर ही शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासा देणारी बाब ठरेल. Tur market rate.

बाजार समित्यांमधील आजचे तूरीचे दर ( 08/02/2024 )
बाजार समिती आवक किमान दर कमाल दर सर्वसाधारण दर
लोहा 19 क्विंटल 9000 10230 10001
तुलजापुर 30 क्विंटल 9500 10500 10100
मंगरुलपीर 902 क्विंटल 8500 9900 9600
सिंधी ( सेलु ) 1000 क्विंटल 9000 9800 9899
जलकोट 539 क्विंटल 9700 10521 10123
दुधणी 448 क्विंटल 9200 10460 9988
काटोल 350 क्विंटल 9200 9901 10566
यावल 50 क्विंटल 9000 9776 10006

Leave a Comment