शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज..! रेशीमला मिळत आहे ५३ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव व तुती लागवडीसाठी अनुदान. Tuti Lagwad Reshim Udyog Vikas Yojana.

WhatsApp Group Join Now

Tuti Lagwad Reshim Udyog Vikas Yojana. राज्यात सतत अतिवृष्टी, गारपीट, चक्रीवादळ व अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्याच्या शेती उत्पन्नात घट होत असून, शेतकऱ्याची आर्थिक स्थिती खालावत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी एक उत्तम पर्याय म्हणून रेशीम शेती समोर येत आहे. सध्या राज्यात रेशीमला 53 हजार रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळत आहे व राज्य शासन तुती लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित देखील करत आहे.

राज्यात रेशीम शेतीसाठी चांगले दिवस.

राज्यात मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांनी रेशीम शेतीला प्रधान्य दिले आहे. व सध्या बाजारात रेशीम कोषाला किमान 33 हजार रुपये तर कमाल 53 हजार रुपये तर सरासरी 46 हजार 600 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांचा रेशीम शेतीकडे कल वाढला आहे.Tuti Lagwad Reshim Udyog Vikas Yojana.

📢 हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! राज्य सरकारची आणखिन २ लाख सौर कृषि पंपाची घोषणा.पहा संपूर्ण बातमी..!

रेशीम उत्पन्नात नांदेड जिल्हा अग्रेसर.

नांदेड जिल्ह्यामध्ये तुतीची जुनी लागवड 312 एकरवर असून या हंगामात जून महिन्यामध्ये आणखीन 150 एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावर तुतीची लागवड केली आहे. दरम्यान जिल्ह्यात रेशीम शेतीला प्रोत्साहन मिळण्यासाठी प्रशासनाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.

प्रशासनाकडून रेशीम शेतीसाठी प्रोत्साहन.

Tuti Lagwad Reshim Udyog Vikas Yojana. जिल्ह्यात रेशीम शेतीचे लागवड क्षेत्र वाढावे यासाठी प्रशासन महा रेशीम अभियान राबवते. त्यामुळे रोजगार हमी योजनेअंतर्गत 121 एकर तर शेतकरी व समग्र योजनेअंतर्गत 190 शेतकऱ्यांनी 199 एकर रेशीम शेतीसाठी नोंदणी केली आहे. आणि या शेतकऱ्यांच्या तुती लागवडीला जून 2024 मध्ये सुरू होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

📢 हे पण वाचा :- खुशखबर..! या जिल्ह्याला अवकाळी मदतीसाठी 206 कोटी रुपये मंजूर, तुमचे बँक खाते तपासा. कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा..!

रेशीम शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर पुरस्काराचे आयोजन.

यावर्षी रेशीम संचालनयाकडून रेशीमचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी रेशीमरत्न हा पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहे. या अंतर्गत निवड समितीकडून निवड करण्यात येणाऱ्या प्रथम शेतकऱ्यास 11000 रुपये रोख धनराशी तर द्वितीय शेतकऱ्यास 7500 रुपये रोख धनराशी आणि तृतीय शेतकऱ्यास 5000 हजार रुपये रोख धनराशी पारितोषक म्हणून देण्यात येणार आहे.

पुरस्कारासाठी फक्त हेच शेतकरी होणारा पात्र.

रेशीम संचालनाकडून रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कारांसाठी शेतकऱ्याकडे किमान एक एकर क्षेत्रावर तुतीची लागवड असावी,

व जिल्हा रेशीम कार्यालयात त्याने तुती क्षेत्राची नोंद केलेली असावी,

रेशीम कोशातून वार्षिक किमान एक लाख रुपयांचे उत्पन्न शेतकरी काढत असावा,

कोष विक्रीची शेतकऱ्याकडे पावती असावी व शेतकऱ्यांनी कीटक संगोपन ग्रहाचे बांधकाम केलेले असावे.

आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा स्थायी नागरिक असायला हवा,

या सर्व निकषांमध्ये पात्र असणारे शेतकऱ्यांना हा पुरस्कार शासनाकडून दिला जातो.Tuti Lagwad Reshim Udyog Vikas Yojana.

Leave a Comment