UAE RAM MANDIR दुबईतील राममंदिराचे मोदिजींच्या हस्ते उद्घाटन ; या आहेत मंदीराच्या खास गोष्टी.

WhatsApp Group Join Now

UAE RAM MANDIR भारत देशाचे आद्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले आणि मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. तो क्षण देशवासीयांसोबतच संपूर्ण जगातील सनातनी लोकांसाठी अमूल्य होता. आणि यात अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती दुबईमध्ये तयार करण्यात आली असून आज या मंदिराचे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

दुबईतील राम मंदिराचे उद्घाटन.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ फेब्रुवारी २०१८ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व्दारे दुबईमधील पहिल्या राम मंदिराची आधारशीला ठेवली होती. आणि तब्बल पाच वर्षानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच या मंदिराचे आज उद्घाटन होणार आहे मंदिरात प्रभू रामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.UAE RAM MANDIR.

दुबईतील राम मंदिराचे खास वैशिष्ट्य.

UAE RAM MANDIR दुबईमधील पहिले राम मंदिर हे दुबई सरकार 700 कोटी पेक्षा जास्त लागत रकमेतून बनवत आहे. या पहिल्या राम मंदिरासाठी दुबई सरकारने अबुधाबी नॅशनल हायवे वरती २७ एकर जागेत मंदिराची निर्मिती केली आहे. राम मंदिर वैदिक संस्कृती लक्षात घेऊन बनवले आहे.

मंदिर बनवण्यासाठी सर्वोत्तम लाल सेंड स्टोन चा वापर केला आहे आणि या मंदिराची उंची 108 फूट आहे.

तसेच हे मंदिर बनवण्यासाठी १.८ मिलियन विटांचा वापर करण्यात आला आहे.

मंदिराला सात शिखरे असून प्रत्येक शिखर हे दुबईतील सात अमिरातींचे प्रतीक म्हणून पाहिले जाते.

दुबईतील प्रत्येक मंदिराच्या शिखरावर आणि भिंतीवर रामायणातील आणि हिंदू देवतांच्या कथा कोरल्या आहेत.

हे पण वाचा :- सोन्याचे भाव घसरले ; सोने खरेदी करण्याची संधी चुकू नका..!

भाविकांसाठी मंदिर परिसरात खास आकर्षण.

अबुधाबीतील या श्रीराम मंदिर परिसरात मंदिरा शिवाय अन्य इमारती असणार आहेत, यामध्ये प्रार्थनेसाठी स्वतंत्र कक्ष, भाविकांच्या प्रसादासाठी स्वतंत्र्य कक्ष, लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यान व वाचकांसाठी भव्य असे ग्रंथालय उभारण्यात आले आहे.UAE RAM MANDIR.

राम मंदिराचे धार्मिक वैशिष्ट्य.

दुबईतील पहिल्या राम मंदिरासाठी भारतातून कंटेनर द्वारे गंगा यमुना यांना त्यांचे पवित्र पाणी नेण्यात आले आहे. आणि हे पवित्र पाणी मंदिराच्या दोन्ही बाजूने सतत प्रवाहित होत राहणार आहे.

तसेच वाराणसीतील गंगा नदीकाठच्या घाटांप्रमाणे या राम मंदिरात नजीक घाट उभारण्यात आला आहे.

दक्षिण आघातामधील पहिल्या हिंदू मंदिरा मध्ये गंगा यमुना सरस्वती या नद्यांच्या उगम स्थानांचा आशय घेणारा धबधबा तयार करण्यात आला आहे, ज्याला उत्कृष्ट अशा लाईटद्वारे डिझाईन करण्यात आले आहे.

हे पण वाचा :- अशोक चव्हाणांचा भाजपात प्रवेश ; चव्हाण यांच्यावर पक्षाची मोठी जिम्मेदारी..!

दुबईतील राम मंदिरात या देवी-देवतांची स्थापना होणार.

UAE RAM MANDIR दक्षिण आखातातील पहिल्या हिंदू मंदिर दुबईमध्ये बांधण्यात आले आणि या दुबईच्या राम मंदिरामध्ये हिंदू धर्मातील प्रभू श्रीराम, माई सीता, श्रीकृष्ण, स्वामीनारायण आणि अय्यप्पा या देवी देवतांसोबत हिंदू धर्मातील इतर देवी देवतांचे देखील स्थापना करण्यात येणार आहे.

काय आहे प्रभू रामाच्या दुबईतील मंदिराचे महत्व.

दुबईमध्ये विविध देशांचे लोक राहतात यामध्ये सर्वाधिक भारतातील लोकांचा समावेश आहे. साधारणता UAE मध्ये 3.5 दशलक्ष भारतीय लोक आहेत आणि या भारतीय लोकांच्या आस्तेसाठी मंदिराचे विशेष महत्त्व आहे. दुबईतील पहिल्या राम मंदिरामुळे UAE आणि भारतातील मैत्री संबंध अधिक घट्ट होतील.

Leave a Comment