VIHIR ANUDAN YOJANA विहिरीच्या अनुदानामध्ये 30% वाढ ; आता घरबसल्या मोबाईलद्वारे करा विहिरीसाठी अर्ज.

WhatsApp Group Join Now

VIHIR ANUDAN YOJANA राज्यात शेतकऱ्यांना शेतीसाठी शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी राज्य सरकार वेगवेगळ्या योजना राबवत आहे. ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक सिंचन, तुषार सिंचन, मोटर, पाईप व विहीर आणि बोरवेल यांसारख्या सिंचनाच्या सुविधा देखील उपलब्ध करून देत आहे. आणि आता तर शेतकऱ्यांना विहिरीसाठी किंवा इतर साधनांसाठी अर्ज करणे अगदीच सोपे झाले आहे. आता शेतकरी त्याच्या शेती शिवारातून घरबसल्या आपल्या मोबाईलद्वारे विहिरीसाठी अर्ज करू शकणार आहे. तर मग मोबाईल द्वारे हा अर्ज कसा करायचा आणि काय असेल याची प्रक्रिया याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या लेखात जाणून घेऊया.

विहिरीसाठी अर्ज करणे झाले सोपे.

कोरडवाहू शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची शेती रब्बी हंगामासाठी तरी वलीताखाली यावी यासाठी राज्य शासनांतर्गत मागील त्याला विहीर योजना राबवली जात आहे. व या विहिरीसाठी पूर्वी शेतकऱ्यांना अर्ज करणे खूप अवघड जात होते याच कारणामुळे राज्य सरकारने आता एका मोबाईलची निर्मिती करून त्या अंतर्गत घरबसल्या शेतकऱ्याला विहिरीसाठी अर्ज करता येणार आहे.VIHIR ANUDAN YOJANA.

हे पण वाचा :- वाळुसाठी ऑनलाइन अर्ज चालु ; या लोकांना मिळणार मोफत वाळू..!

काय आहे ते मोबाईल ॲप.

VIHIR ANUDAN YOJANA महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीचा लाभ घेऊ इच्छित असलेल्या शेतकऱ्यांसाठी हाॅर्टी नावाच्या ॲपची राज्य सरकारने निर्मिती केली आहे. शेतकऱ्याला आपल्या मोबाईल मध्ये हे ॲप डाऊनलोड करून घ्यायचे आहे व या ॲप मध्ये विहिरी संबंधित आणि शेतकऱ्यासंबंधीतील सर्व माहिती भरून योजनेसाठी अर्ज सादर करायचा आहे.

या ॲपद्वारे कोणकोणत्या योजना मिळणार.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या या मोबाईल ॲप द्वारे शेतकरी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत असणाऱ्या सर्व योजनांचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये शेततळे योजना, फळबाग लागवड योजना व मागील त्याला विहीर योजना अशा योजनांचा समावेश होतो.

योजनेच्या अनुदानात वाढ.

पूर्वी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत मागील त्याला विहीर या योजनेसाठी तीन लाख रुपयांचे अनुदान दिले जात होते. आता या अनुदानामध्ये वाढ करून शेतकऱ्यांना विहिरीसाठी चार लाख रुपये पर्यंतचे अनुदान दिले जात आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.VIHIR ANUDAN YOJANA.

हे पण वाचा :- या शेतकऱ्यांचे पी एम किसानचे हाफ्ते कायमचे बंद होणार..!

योजनेचे निकष व पात्रता काय आहे.

VIHIR ANUDAN YOJANA महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सर्व योजनांसाठी मागासवर्गीय, दारिद्र रेषेखालील शेतकरी व अल्पभूधारक शेतकरी अर्ज करू शकतात. तसेच योजनेस अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याकडे सातबारा, आठ/अ, आधार कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो व चालू मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रांचे असायला हवी.

Leave a Comment