WEATHER FORECAST MAHARASHTRA राज्यात आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता ; या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा.

WhatsApp Group Join Now

WEATHER FORECAST MAHARASHTRA राज्यात मागील पंधरा दिवसात विदर्भ पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळासहित अवकाळी पावसाने हजेरी लावली व रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा व उन्हाळी बाजरी या पिकांचे नुकसान झाले. व पुन्हा एकदा पुढील दोन दिवस राज्यात मेघा गर्जनेसह जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

या जिल्ह्यात पावसासाठी पोषक वातावरण.

WEATHER FORECAST MAHARASHTRA राज्यातील विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये सध्या पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. या जिल्ह्यामध्ये दिवसभर उन्हाचा कडक चटका तर संध्याकाळी वातावरणात गारठा तयार होतो. दोन दिवसापासून काही जिल्ह्यात ढगाळ वातावरण देखील तयार होत आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर ; पी एम किसानचा हाप्ता 28 फेब्रुवारीला 4000 रुपयांचा जमा होणार..!

या जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा.

राज्यात कमान आणि कमाल तापमानामध्ये चढउतार कायम आहे. त्यामुळे आजपासून विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. व या बहुतांश जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 25°c च्या खाली असला तरी उन्हाचा चटका कायम आहे.

शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी.

WEATHER FORECAST MAHARASHTRA राज्यात खरीप हंगामाच्या सुरुवातीला अपुऱ्या पावसामुळे व त्यानंतर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके हातून गेली. व आता रब्बी हंगामातील पिके पदरात पडणारच की राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे, विदर्भातील व मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी शेतकरी राज्य शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी करत आहेत.

हे पण वाचा :- अखेर राज्य सरकारने जाहीर केले की, नमोचा दुसरा हाप्ता 6000 रुपयांचाच मिळणार..!

राज्यात कमी दाबाचा पट्टा सक्रिय.

सध्या राज्यात मराठवाड्यावर चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम आहे. व मराठवाड्यापासून कर्नाटक ते पुढे आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टी पर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळे, राज्यातील मराठवाड्यातील जिल्ह्यांना व पश्चिम महाराष्ट्रातील पूर्वी जिल्ह्यांना पुढील दोन दिवस पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा सर्वाधिक धोका.

राज्यात पुढील दोन दिवस चक्रीवादळासह अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ज्यामध्ये मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, संभाजीनगर व विदर्भातील यवतमाळ, वर्धा, अकोला, बुलढाणा, अमरावती, गडचिरोली, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर व नागपूर या जिल्ह्यांना पावसाचा सर्वाधिक धोका वर्तवण्यात आला आहे.WEATHER FORECAST MAHARASHTRA.

Leave a Comment