दुबईतील राममंदिराचे उद्घाटन ; या आहेत मंदीराच्या खास गोष्टी.

नरेंद्र मोदी यांनी ११ फेब्रुवारी २०१८ रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे UAE मधील पहिल्या हिंदू मंदिराची आधारशीला ठेवली होती.

आणि तब्बल सहा वर्षानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच या मंदिराचे आज उद्घाटन होणार आहे.

दुबई सरकारने या मंदिरासाठी 700 कोटी पेक्षा अधिक खर्च केला असून मंदिर 27 एकर जागेत तयार केले आहे.

मंदिर बनवण्यासाठी सर्वोत्तम अशा लाल सेंड स्टोनचा व मार्बलचा वापर केला आहे जे की भारतातील राजस्थान येथून मागवले आहे.

येथे श्रीराम मंदिरा शिवाय प्रार्थना कक्ष, प्रसाद भोजनालय, उद्यान व ग्रंथालय यांच्या स्वतंत्र इमारती आहेत.

या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे गंगा यमुना सरस्वती नद्यांचे पवित्र पाणी मंदिराच्या चहूबाजूने प्रवाहित होत राहणार आहे.

दुबईतील पहिल्या हिंदू मंदिरामध्ये प्रभू श्रीरामांसोबत, माई सीता, श्रीकृष्ण, स्वामीनारायण आणि अय्यप्पा स्वामी या देवतांची स्थापना होणार आहे.

मुस्लिम देशातील पहिल्या हिंदू मंदिराबद्दलच्या सविस्तर अपडेट साठी आमच्या वेबसाईटला  भेट द्या.