प्रथमच...एका दिवसात तिघांना तर पंधरा दिवसात पाच जणांना भारतरत्न जाहीर..!

सरकारने गेल्या १७ दिवसांमध्ये पाच जणांना भारतरत्न' पुरस्कार जाहीर केला आहे. २३ जानेवारी रोजी स्व. कर्पूरी ठाकूर यांना तर, ३ फेब्रुवारी रोजी लालकृष्ण अडवाणी यांना पुरस्कार जाहीर झाला.

आज माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह, माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव व कृषितज्ज्ञ डाॅ. स्वामीनाथन यांना भारतरत्न जाहीर.

माजी पंतप्रधान चौधरी चरणसिह हे शेतकरी नेते म्हणूनच ओळखले जातात. शेतकऱ्यांचे हक्क आणि कल्याणासाठी त्यांनी संपूर्ण जीवन समर्पित केले होते. त्यांचे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान होते.

सलग आठ वेळा लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर आणि काँग्रेस पक्षात ५० वर्षापेक्षा जास्त काळ राहिल्यानंतर पी. व्ही. नरसिंह राव पंतप्रधान झाले. त्यांना १७ भाषा अवगत होत्या.

स्वातंत्र्यानंतर देशामध्ये अन्नधान्याची टंचाई असतना डॉ. स्वामिनाथन यांनी महत्त्वपूर्ण संशोधन करुन कृषिक्रांती घडविली. त्यांनी जास्त उत्पादन देणारे गव्हाचे वाण विकसित केले होते. 

शेअर बाजारात घसरण ; या कंपनीत गुंतवणूक करण्याची संधी.आधिक माहितीसाठी वर ढकला