शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! बोरवेल साठी ४०००० रुपये अनुदान.

शेतकऱ्यांना सिंचनाच्या शाश्वत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन वेगवेगळ्या योजना राबवत आहे.

मागेल त्याला विहीर व मागेल त्याला शेततळे या योजनांना पूरक अशी नवीन योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे.

जमिनीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली जात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणी लागत नाही.

त्यामुळे विहिरीपेक्षा अधिक खोल बोरवेल करण्यासाठी राज्य शासन शेतकऱ्यांना अनुदान देत आहे

या योजनेअंतर्गत बोरवेल साठी 80 टक्के अनुदान देण्यात येत आहे.

यामध्ये 25 हजार रुपये बोरवेलसाठी तर १५ हजार रुपये विद्युत पंपासाठी देण्यात येतात.

योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्याला सर्व अधिकृत कागदपत्रांसोबत महाडीबीटी फार्मर या संकेतस्थळावर अर्ज करायचा आहे.

योजनेबद्दलच्या अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या