राज्य शासनाव्दारे कर्जमाफीची घोषणा ; या शेतकऱ्यांचे होणार सरसकट कर्ज माफ.

महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने 28 फेब्रुवारी 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करून कर्जमाफी जाहीर केली.

राज्यातील जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या काळात नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे सरसकट पीक कर्ज माफ होणार आहे.

या काळातील बाधित शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी याआधी 52,562.00 कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यात आला होता.

उर्वरित कर्जमाफीसाठी 379.99 कोटी रुपये राज्य शासनाने 2023 च्या हिवाळी अधिवेशनामध्ये जाहीर केली होते.

या जाहीर निधीच्या 70 टक्के म्हणजे 265.99 कोटी रुपये आता वितरित करण्यात येणार आहेत.

व हा निधी जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या काळातील बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

त्यामुळे फक्त नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांनाच या कर्जमाफीचा फायदा होणार आहे.

कर्जमाफी बद्दलच्या सविस्तर अपडेटसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.