शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! नमोचा दुसरा व तिसरा हप्ता एकत्र जमा होणार.

पी एम किसानचा सोळावा हप्ता येत्या 28 फेब्रुवारी रोजी वितरित करण्यात येणार आहे.

व पी एम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता वितरणासाठी राज्य शासनाने 1792 कोटी रुपये वितरणास परवानगी दिली.

23 फेब्रुवारी 2024 रोजी आणखीन एक शासन निर्णय निर्गमित  करून योजनेच्या तिसऱ्या हप्त्याच्या वितरणासाठी 2000 कोटी रुपये जाहीर केले.

तसेच यापुढे पी एम किसान च्या हप्त्याबरोबरच नामोचा  हप्ता वितरित केला जाईल असे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले होते.

व पी एम किसानचा सोळावा हप्ता महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ येथून नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित होणार आहे.

त्यामुळे 28 फेब्रुवारी रोजी पीएम किसान च्या सोळाव्या त्यासोबत नमो शेतकरीच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे एकत्र वितरण केले जाऊ शकते.

म्हणजे महाराष्ट्र राज्यातील पीएम किसान च्या लाभार्थ्यांना सोळावा हाप्ता 6000 रुपयांचा मिळू शकतो.

नमो शेतकरीच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याच्या सविस्तर अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या