पी एम किसानच्या सोळाव्या हाप्त्याच्या घोषणेनंतर, नमोच्या दुसऱ्या हाप्त्याची देखील तारीख जाहीर.

केंद्र सरकारने 21 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी एक वाजता पीएम किसान च्या सोळाव्या हाप्त्याची तारीख जाहीर केली.

याच फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 28 फेब्रुवारी 2024 रोजी हा सोळावा हप्ता वितरित केला जाईल.

व या घोषणेनंतर लगेच दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्य सरकारने नमोच्या दुसऱ्या हप्त्याच्या वितरणासाठी एक शासन निर्णय निर्गमित केला.

या शासन निर्णयाद्वारे दुसऱ्या हप्त्यासाठी १७९२ कोटी रुपये निधी वितरण करण्यास मान्यता देण्यामध्ये आली.

परंतु या शासन निर्णयात दुसरा हाप्ता कधी वितरित केला जाईल याची तारीख मात्र अधिकृतरित्या देण्यात आली नव्हती.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे नमोच्या या पुढील प्रत्येक हाप्त्याचे वितरण पीएम किसानच्या हप्त्यांसोबत करण्यात येणार आहे.

त्यामुळे येत्या 28 फेब्रुवारी रोजी पीएम किसानच्या 16व्या हाप्त्यासोबत नमोच्या हप्त्याचे देखील वितरण होण्याची शक्यता आहे.

नमोच्या दुसऱ्या हाप्त्याच्या सविस्तर अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.