नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता जाहीर ; या तारखेला यांच्या हस्ते होणार हप्त्याचे वितरण

केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी सन्मान निधि  योजनेची घोषणा केली आहे.

या योजनेअंतर्गत देखील पीएम किसान योजनेप्रमाणे वार्षिक सहा हजार रुपयांचा आर्थिक लाभ देण्यात येतो.

दर चार महिन्याने दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो.

त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचे एकत्र वार्षिक 12000 रुपये आर्थिक लाभ मिळत आहे.

नमो शेतकरी योजनेस पीएम किसान योजनेअंतर्गतचे सर्व लाभार्थी पात्र आहेत.

व नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता या पात्र लाभार्थ्यांना 26 ऑक्टोबर 2023 रोजी वितरित करण्यात आला आहे.

व आता आगामी दुसरा हप्ता देखील या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे.

योजनेबद्दलच्या सविस्तर अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.