अखेर केंद्र सरकारने जाहीर केले की फेब्रुवारीच्या किती तारखेला सोळावा हप्ता जमा होणार ; जाणून घ्या तारीख.

21 फेब्रुवारी 2024 बुधवारी दुपारी एक वाजता केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेच्या पोर्टल वर 16 व्या हप्त्याची तारीख जाहिर केली.

आगामी काळात देशात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका होणे निश्चित आहे. व मार्च महिन्यात देशात आचारसंहिता लागू होऊ शकते.

याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी महिन्यामध्येच पीएम किसान योजनेचा हप्ता केंद्र सरकारला वितरित करावा लागणार होता.

व आता फेब्रुवारीच्याच शेवटच्या आठवड्यात 28 फेब्रुवारी रोजी या सोळाव्या हप्त्याचे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यात करण्यात येणार आहे.

या सोळाव्या हप्त्याबरोबरच राज्यातील नमो शेतकरीच्या लाभार्थ्यांना नमोच्या दुसऱ्या हप्त्याचे देखील वितरण केले जाऊ शकते.

म्हणजे  राज्यातील पीएम किसान च्या पात्र लाभार्थ्यांना एकत्र दोन्ही योजनांचे मिळून 4000 रुपये बँक खात्यात जमा केले जातील.

तसेच आज पीएम किसानच्या पोर्टलवर जाहीर करण्यात आलेल्या अपडेट नुसार लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण असणे अनिवार्य आहे.

सोळाव्या हाप्त्याच्या तारखेबद्दलच्या संपूर्ण आणि सविस्तर अपडेटसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.