प्रत्येक कुटुंबाला मोफत मिळणार वीज ; केंद्र सरकारच्या नव्या योजनेची घोषणा.

देशातील एक कोटीहून अधिक कुटुंबांना मोफत वीज देण्यासाठी केंद्र शासनाने "प्रधानमंत्री सूर्योदय योजना " जाहीर केली आहे.

योजनेअंतर्गत एक कोटी होऊन अधिक कुटुंबांच्या घरांवर मोफत सोलार रूप टॉप पॅनल बसवून दिली जाणार आहे.

देशाला सोलर एनर्जी मध्ये आत्मनिर्भर बनवून देशात सोलार एनर्जीचा वापर वाढवणे व वायुप्रदूषण कमी करणे हे योजनेचे उद्देश आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न दीड लाखांपेक्षा कमी असायला हवे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या NATIONAL PORTAL FOR ROOFTOP SOLAR या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करायचा आहे.

अर्ज करण्यासाठी लाभार्थ्याकडे आधार कार्ड, विज बिल प्रत, बँक पासबुक, चालू मोबाईल नंबर आणि पासपोर्ट साईज फोटो असायला हवा.

लाभार्थ्याच्या घरावर सोलर रूफ टॉप बसवल्यानंतर पोर्टलवर माहिती अपलोड करून योजनेच्या सबसिडीचा लाभ घ्यायचा आहे.

योजनेबद्दलच्या सविस्तर आणि अधिकच्या माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.