शेतमाल विकण्यास  घाई करू नका ; शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घ्या..!

राज्यासह देशात शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी शेतकरी आंदोलने करत आहेत.

परंतु शेतकऱ्याला आपला शेतीमाल न विकता या तारण योजनेअंतर्गत आर्थिक लाभ घेता येतो.

राज्य सरकारच्या राज्य कृषी पणन महामंडळाच्या निर्देशानुसार राज्यात शेतमाल तारण कर्ज योजना राबवली जात आहे.

या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालाच्या एकूण रकमेच्या 75 टक्के रक्कम बाजार समित्यांकडून दिली जाते.

तसेच या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीमालावर 6 महिन्यासाठी 6 टक्के व्याजदराने कर्ज दिले जाते.

शेतकऱ्यांना कमी भाव असताना शेतीमालाची विक्री न करता त्यांना त्यांच्या शेतमालावर आर्थिक लाभ देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याला त्यांच्या जवळपासच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये योजनेबद्दलची चौकशी करायची आहे.

योजनेबद्दलच्या अधिक आणि सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.