शेतकऱ्यांना ९० टक्के अनुदानावर ट्रॅक्टर व उपसाधने.

राज्य सरकारच्या समाज कल्याण विभागाअंतर्गत शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर व उपसाधने देण्यात येत आहेत.

या ट्रॅक्टरच्या व उपसाधनाच्या खरेदीसाठी सरकार 90 टक्के अनुदान किंवा जास्तीत जास्त 3.15 लाख रुपये रक्कम देते.

या योजनेअंतर्गत ट्रॅक्टर व त्याचे उपसाधने रोटर, कल्टीवेटर, ट्रेलर यांची खरेदी करता येते.

योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा स्थायी नागरिक असायला हवा.

राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध स्वंयसहायता बचत गटातील लाभार्थ्यांना योजनेस अर्ज करता येतो.

योजनेस अर्ज करण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागा मार्फत जाहिरात काढण्यात येते.

व त्यानंतर लाभार्थ्याला ऑनलाईन पद्धतीने mini.mahasamajkalyan.in या संकेतस्थळावर अर्ज सादर करायचा आहे.

त्यानंतर अर्जाची पडताळणी करून योजनेसंबंधीतील अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते.

योजनेबद्दलच्या सविस्तर अपडेटसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.