राज्यात आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता ; या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा.

राज्यात मागील पंधरा दिवसात विदर्भ पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली.

रब्बीचे ज्वारी, गहू व हरभरा पिकांची कापणी चालू असल्यामुळे या पिकांचे अतोनात नुकसान झाले.

सध्या राज्यात दिवसा उन्हाचा चटका कायम असून संध्याकाळी वातावरण गार राहते

त्यामुळे विदर्भ व मराठवाड्यात अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे.

मराठवाड्यापासून ते तमिळनाडू व पुढे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी पर्यंत कमी दाबाचा पट्टा सध्या सक्रिय आहे.

Fill in some text

यामुळेच पुढील दोन दिवस राज्यातील विदर्भ व मराठवाड्यातील जिल्ह्यांना चक्रीवादळ व अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड तर विदर्भातील बुलढाणा, यवतमाळ, अकोला, भंडारा या जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्यातील हवामानाच्या सविस्तर अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.