WHEAT MARKET PRICE यावर्षी गहू करणार मालामाल ; बाजार समित्यांमध्ये गव्हाला विक्रमी भाव.

WhatsApp Group Join Now

WHEAT MARKET PRICE महाराष्ट्र राज्य मधील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक असलेले सोयाबीन व कापूस हंगामाच्या सुरुवातीपासून दबावात विक्री होत होते. तसेच मागील पंधरा दिवसात कापसाच्या दरामध्ये सुधारणा आढळून आली आहे परंतु सोयाबीनचे दर जैसे थेच आहेत. तर दुसरीकडे रब्बी हंगामातील ज्वारी आणि गहू या पिकाला बाजार समितीमध्ये चांगला भाव मिळत आहे.

बाजार समितीमध्ये गव्हाला विक्रमी भाव.

WHEAT MARKET PRICE यंदा राज्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाल्याने जमिनीत ओलावा कमी राहिला, त्यामुळे रब्बी हंगामातील पिके शेतकऱ्यांच्या हाती लागतील का नाही यात शंका आहे. दुसरीकडे राज्यात गहू व ज्वारी या पिकांचा पेरा कमी झाला त्यामुळे यांच्या दरात प्रचंड वाढ पाहिला मिळत आहे. सध्या राज्यातील बाजार समितीमध्ये व खाजगी मार्केटमध्ये गहू 2500 रुपये प्रतिक्विंटल ते तीन हजार रुपये प्रतिक्विंटल या दराने सरसकट विक्री होत आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांसाठी खुशखबर ; पी एम किसानचा हाप्ता 28 फेब्रुवारीला 4000 रुपयांचा जमा होणार..!

बाजारात नवीन गव्हाला प्रचंड मागणी.

राज्यात यावर्षी पर्जन्यमानामध्ये 32 टक्के तुट पाहायला मिळाली त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिके घेण्यासाठी देखील पाणी उरले नाही. यामुळेच शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर येणाऱ्या हरभरा व ज्वारी या पिकांची निवड केली. मोजके पाणी उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांनी राज्यात गव्हाचे उत्पन्न घेतले आहे व या नवीन गावाला सध्या बाजार समितीमध्ये तसेच खाजगी मार्केटमध्ये आणि घरगुती खरेदीसाठी देखील प्रचंड मागणी आहे.WHEAT MARKET PRICE.

गहू विक्रीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक.

WHEAT MARKET PRICE राज्यात व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांचा गहू हा 1500 ते 1600 रुपये प्रति क्विंटल या दराने विक्री केला जात आहे. व शेतकरी देखील आर्थिक टंचाईमुळे आणि पैशाच्या कर्जामुळे व्यापाऱ्यांना गहू विक्री करत आहेत. तर दुसरीकडे हेच व्यापारी ग्राहकांना 2600 रुपये प्रति क्विंटल ते 3000 रुपये प्रति क्विंटल या दराने या गव्हाची विक्री करत आहेत. याकडे प्रशासनाने व बाजार समितीने लक्ष देऊन ही शेतकऱ्यांची फसवीगिरी थांबवली पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

हे पण वाचा :- नमोच्या हाफ्त्याची देखील तारीख जाहिर ; हाफ्ता वित्ररणाचा शासन निर्णय आला..!
बाजार समिती मधील आजचे गव्हाचे बाजार भाव.
बाजार समिती  आवक  किमान दर  कमाल दर  सर्वसाधारण दर 
लासलगांव  2622 2598 2788 3110
शहाडा  423 2699 2800 3010
राहुरी  1822 2400 2600 2600
पाचोरा  644 2900 3100 3100
कारंजा  754 2899 3200 3110
करमाला  765 3000 3120 3100
अंबड  3222 2800 3000 3100

 

Leave a Comment